IMPIMP

Shivsena Vs Congress | पुन्हा एकदा वादाची ठिणगी, स्थानिक काँग्रेस आमदारावर आरोप करत शिवसेना नेत्याचे थेट CM ठाकरेंना पत्र

by bali123
Shivsena Vs Congress | controversy once again between shivsena and congress former minister and shivsena leaders Vijay Shivtare

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Shivsena Vs Congress | भाजपने (BJP) दिलेला शब्द पाळला नसल्याचे सांगत 2019 च्या विधानसभा निवडणूक (Assembly election) निकालानंतर शिवसेनेनं (Shivsena) युतीतून (Alliance) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्यात शिवसेना, काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) स्थापना करुन सत्ता स्थापन केली. परंतु आघाडीत सारं काही ठीकठाक असल्याचे पहायला मिळत नाही. कुठल्या ना कुठल्या कारणामुळे खटके उडताना पहायला मिळत आहे. स्वबळाच्या नाऱ्यावरुन काँग्रेस आणि शिवसेनेतील नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक पहायला मिळत आहे. त्यातच आता माजी मंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते विजय शिवतारे (Shivsena Leader Vijay Shivtare) यांनी पुरंदरच्या काँग्रेस आमदारावर (Purandar Congress MLA) गंभीर आरोप (Allegation) करत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र (Letter) लिहिलं आहे.

श्रेयवादावरून दोन्ही पक्षात खटके

2019 च्या विधानसभा निवडणुकीत (Assembly election 2019) शिवसेनेच्या विजय शिवतारे (Shivsena leader Vijay Shivtare) यांना काँग्रसेचे संजय जगताप (Congress leader Sanjay Jagtap) यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला.
मात्र राज्यात महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) स्थापना झाली आणि काँग्रेस आणि शिवसेना (Congress and Shivsena) हे पक्ष एकत्र आले.
राज्यात शिवसेना आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीत एकत्र असताना देखील आजी-माजी आमदारांमध्ये श्रेय वादावरून (Credit dispute) खटके उडत आहेत.
आता विजय शिवतारे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून विद्यमान आमदार संजय जगताप (MLA Sanjay Jagtap) यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

विजय शिवतारे यांनी पत्रात म्हटले….

माझ्या मंत्रिपदाच्या कालावधीत पुरंदर (Purandar), भोर (Bhor) आणि वेल्हा (Velha) या तीन तालुक्यासाठी जीवनदायिनी ठरणाऱ्या गुंजवणी धरणाचे (Gunjavani dam) काम मार्गी लावले.
तसेच पुरंदर तालुक्यात (Purandar taluka) आत्ता जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
परंतु, या कामात अडथळे निर्माण करण्याचे काम स्थानिक आमदाराकडून (local MLA) केले जात आहे.
अधिकाऱ्यांना धमकावत काम बंद करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
स्थानिक आमदार संजय जगताप (Local MLA Sanjay Jagtap) यांचा या कामाचे भूमिपूजन स्वत:च्या हस्ते करावे असा त्यांचा आग्रह असल्याचे समजतेय.
वास्तविक या प्रकल्पाचं काम बंद व्हावं,
यासाठी नेहमीच प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीच्या हातून जर प्रकल्पाचा (project) शुभारंभ झाला तर त्यासारखी शोकांतिका दुसरी असू शकत नाही,
अशा शब्दांत विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी पत्रातून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title : Shivsena Vs Congress | controversy once again between shivsena and congress former minister and shivsena leaders Vijay Shivtare

Related Posts