IMPIMP

Nawab Malik : फार्मा कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर संपूर्ण भाजप का घाबरली? फडणवीसांनी वकीलपत्र घेतलं का?

by Team Deccan Express
Nawab Malik | NCB leader nawab maliks four word tweet serious allegations made bjp leader devendra fadnavis said i am coming

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकावर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत. एका मंत्र्यांच्या सीओडींनी फोन केल्यानंतर पोलिसांकडून ही कारवाई केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यानंतर फडणवीस यांच्या गंभीर आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक Nawab Malik यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

रेमडेसिवीरची साठेबाजी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ब्रुक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर राज्यातील संपूर्ण भाजप का घाबरली ? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे वकील आहेत. त्यामुळे त्यांनी या कंपनीच्या मालकाचं वकीलपत्र घेतलं होतं की त्यांचे लागेबंध होते म्हणून त्यांची बाजू घेत होते, हे त्यांनी स्पष्ट करावं, असं आव्हान मलिक यांनी फडणवीस यांना दिले आहे.

काँग्रेसच्या नेत्यानं विचारला फडणवीस अन् दरेकरांना सवाल, म्हणाले – ‘पोलीस एखाद्याला चौकशीसाठी बोलावू शकत नाहीत का?’

ब्रुक फार्मा कंपनीचे मालक दरेकर यांना भेटले
देशात सात कंपन्यांना देशांतर्गत वाटप आणि विक्रीची परवानगी मिळाली आहे. दोन कंपन्यांना परदेशात विक्रीची परवानगी आहे. त्याउलट 17 कंपन्यांना उत्पादनाची परवानगी आहे. निर्यातीवर बंदी घातल्यानंतर काही कंपन्या आमच्याकडे साठा उपलब्ध असून राज्य सरकारकडे विक्रीची परवानगी मागत आहेत. ब्रुक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया हे स्वत: अन्न व औषध मंत्री शिंगणे आणि प्रवीण दरेकर यांना भेटले. माझ्याकडे साठा आहे, परवानगी दिली तर हा साठा देऊ शकतो अशी माहिती दिली. पोलिसांनी निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडे औषधांचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर राजेश डोकानिया यांना बोलावून माहिती घेतली होती, असे मलिक Nawab Malik यांनी यावेळी सांगितले.

‘दिल्लीची हुजरेगिरी करुन महाराष्ट्राची बदनामी करणारे हे मंत्री काय कामाचे ?’

डोकानियाला सोडवण्यासाठी दोन-दोन विरोधी पक्षनेते का गेले ?
देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड हे सर्वजण रात्री सव्वा अकरा वाजता बीकेसीला पोहचले. जर पोलिसांना माहिती मिळाली तर ते चौकशी करतात. माग या डोकानियाला सोडवण्यासाठी या राज्याचे दोन-दोन विरोधी पक्षनेते आणि आमदार का गेले ? राज्यात कुठेतरी भाजपची लोकं साठा मिळणार नाही यासाठी प्रयत्न करत आहेत. जो साठा आहे तो विकत घेऊन आपण विकू ही भूमिका घेत आहेत. साठा देऊ शकतात त्यांना ऑर्डर द्या अशी भूमिका घेत आहेत. पण पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर जेव्हा एखाद्या व्यक्तीला बोलावल्यानंतर ते नेते का जातात हा मोठा प्रश्न आहे, अशी विचारणा मलिक यांनी केली.

भोर पंचायत समिती सभापती निवडणुकीत बंडखोरी केल्याने राष्ट्रवादीतून 2 सदस्यांची हकालपट्टी !

फडणवीस वकील आहेत…
पोलीस यंत्रणा काळा बाजार रोखण्यासाठी, जनतेसाठी काम करत आहे. पण डोकानियाला बोलावल्यानंतर संपूर्ण राज्यातील भाजप का घाबरते ? सगळा भाजप वकिलीसाठी का जात आहे ? फडणवीस वकील आहे… ते वकीलपत्र घेऊन बाजू मांडत होते की त्यांचे संबंध आहेत म्हणून मांडत होते ? जर महाराष्ट्रात हितासाठी पोलीस यंत्रणा, एफडीए काम करत असेल आणि चौकशीसाठी बोलावलं असेल तर भाजपचे प्रमुख नेते तिकडे जातात यावरुन काय संबंध आहेत हा खुलासा केला पाहिजे, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली.

Also Read :

ठाकरे सरकारच्या ‘शिवभोजन थाळी’वर भाजपचा गंभीर आरोप; ‘योजना फक्त दिखाऊ’

एका ओळीचे पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांनी उदयनराजेंना 450 रुपये केले परत

 

Pandharpur : गोपिचंद पडळकरांचा शरद पवारांवर पुन्हा घणाघात, म्हणाले…

पंढरपूर-मंगळवेढ्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या ! अखेरच्या दिवशी भाजपची एकही प्रचारसभा नाही, उद्या मतदान

 

अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचलं, म्हणाले -‘ चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का ?’

 

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

 

स्मृती इराणींचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘कोरोनासाठी मोदी-शहांना जबाबदार धरणे यातून ममतांचे संस्कार दिसतात’


Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

 

अजित पवारांचा फडणवीसांना सणसणीत टोला, म्हणाले -‘आपला नाद कुणी करायचा नाही, सरकार पाडणं हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही’

Related Posts