IMPIMP

मुंबईत ‘लॉकडाउन’ होणार का ? आदित्य ठाकरे म्हणाले…

by bali123
Will there be a lockdown in Mumbai? Aditya Thackeray said ...

सरकारसत्ता ऑनलाइन – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज (गुरुवार, दि. 11 मार्च) जे जे रुग्णालयात कोरोना लशीचा (Coronavirus Vaccine) पहिला डोस दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास घेतला. यावेळी त्यांच्या सोबत त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र तसेच राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) हेही उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना लॉकडाउनच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं.

‘मुंबईत पूर्णत: किंवा अंशत: लॉकडाउन केलं जाणार का?’
कोरोनाचा धोका लक्षात घेता काही भागात पुन्हा लॉकडाउन लागेला का, असा प्रश्न केल्यानंतर आदित्य ठाकरे aaditya thackeray म्हणाले, तुम्ही आणि आम्ही सारेच सध्या मास्क लावत आहोत. प्रत्येक नागरिकानं जर आपापली काळजी घेतली आणि मास्कचा वापर केला तर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल. आणि कोरोनाला आळा बसेल असं त्यांनी सांगितलं. परंतु मुंबईत पूर्णत: किंवा अंशत: लॉकडाउन केलं जाणार का, या प्रश्नाचं उत्तर देणं मात्र त्यांनी टाळलं.

‘जास्तीत जास्त लोकांनी कोरोना लस घेतली पाहिजे’
मुख्यमंत्र्यांनी लस घेतल्यानंतर यावरही आदित्य यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, लसीबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात असताना स्वत: मुख्यमंत्र्यांनी लस घेतली आहे. मला असं वाटतं की, त्यांनी एक उदाहरण जनतेसमोर ठेवलं आहे. त्यामुळं जे जे लोक लस टोचून घेण्याच्या निकषात आहेत, त्या साऱ्यांनीच लस घ्यावी आणि कोरोनाला आळा घालण्यास मदत करावी. जे लस घेतील त्यांना नक्कीच कोरोनापासून सुरक्षा मिळेल आणि त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी कोरोना लस घेतली पाहिजे, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

लसीकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘लस घेताना…’

Pune : बांधकामात गुंतवणूक करण्याच्या अमिषाने 74 लाखाला गंडा, एकावर FIR दाखल

लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत हे विरोधी पक्षाला कधी कळणार?

फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी नागपूरला जाऊन घेतली सरसंघचालकांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा

Related Posts