IMPIMP

Pune Crime | पुण्यात साडेसात लाखांच्या कर्जाचे मागितले 22 लाख; येवलेवाडीमध्ये बेकायदा सावकारी करणार्‍या आशिष पाटणेविरूध्द कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा

by bali123
 Pune Crime News | A case has been filed against the moneylender who demanded 55 thousand even after returning 2.5 lakh on 50 thousand, FIR in Chandannagar police station

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | व्यवसायासाठी ७ लाख ४५ हजार रुपये कर्ज घेतले असताना त्यावर १२ टक्के व्याज लावून जबरदस्तीने पैसे घेतले. त्यावर ४ लाख १५ हजार रुपये व्याजापोटी दिले असतानाही १२ टक्के प्रमाणे एकूण २२ लाख रुपयांची मागणी करुन धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) बेकायदेशीर सावकारी करणार्‍या आशिष पाटणे Money Lender Ashish Patne (रा. येवलेवाडी, कोंढवा) याच्याविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे. याप्रकरणी आय बी एम रोडवर राहणार्‍या एका ३२ वर्षाच्या व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी सर्व प्रथम पहिल्यांदा आशिष पाटणे याच्याकडून ४५ हजार रुपये घेऊन व्याज व मुद्दलासह ५५ हजार रुपये दिले होते. त्यानंतर व्यवसायासाठी वेळोवेळी ऑनलाईन वेगवेगळ्या ठिकाणी ७ लाख ४५ हजार रुपये सप्टेबर २०२० मध्ये घेतले होते.

 

आरोपीने पहिल्या महिन्याचे व्याज कपात करुन बाकी पैशाचे १२ टक्के व्याज लावून फिर्यादीकडून जबरदस्तीने पैसे घेतले. तसेच फिर्यादी हे वेळेवर पैसे देऊ न शकल्याने आरोपी याने फिर्यादी यांच्या घरी जाऊन शिवीगाळ केली. फिर्यादी यांनी आतापर्यंत व्याजापोटी ४ लाख १५ हजार रुपये दिले असता तरी आरोपीने १२ टक्के प्रमाणे २२ लाख रुपये देण्याबाबत धमकी (Pune Crime) दिली आहे. त्यामुळे फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक मधाळे (API Madhale) तपास करीत आहेत.

 

यापुर्वीच पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी नागरिकांना खासगी सावकाराविरूध्द तक्रार करता यावी म्हणून हेल्पलाइन सुरू केली आहे. 9145003100 हा हेल्पलाईनचा क्रमांक (Pune Police Helpline Number) असून यावर व्हॉट्सअ‍ॅपव्दारे तक्रार नोंदवता येणार आहे.

 

Web Title :- Pune Crime | Crime against Money Lender Ashish Patne in Kondhwa Police Station

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

हे देखील वाचा :

Related Posts