IMPIMP

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार प्रशांत जाधव व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’ ! आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 82 वी कारवाई

by nagesh
Pune Crime | MCOCA on the Asif Khan gang of Kondhawa; Pune Police Commissioner Amitabh Gupta's 114th MCOCA action to date

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे शहरातील गुन्हेगारावर (Pune Crime) आळा घालण्यासाठी आणि शहरात कायदा सुव्यवस्था (Law and Order) टिकून ठेवण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा (MCOCA Action) Mokka बडगा कायम ठेवत आतापर्यंत 82 टोळ्याविरुद्ध कारवाई करुन गुन्हेगारांची रवानगी कारागृहात केली आहे. पुण्यातील (Pune Crime) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) हद्दीत दहशत पसरवणारा सराईत गुन्हेगार प्रशांत प्रकाश जाधव (Prashant Prakash Jadhav) व त्याच्या टोळीवर पुणे पोलीस (Pune Police) आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. आयुक्तांनी आजपर्यंत 82 आणि चालु वर्षात 19 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

टोळी प्रमुख प्रशांत जाधव (वय-21 रा. आंबेगाव खुर्द, पुणे) व त्याचा साथीदार जय पांडुरंग निकम Jai Pandurang Nikam (वय-21 रा. आंबेगाव खुर्द) यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. आरोपी प्रशांत जाधव याच्या टोळीवर 2020 पासून गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी परिसरात दहशत निर्माण केली आहे. या टोळीविरुद्ध यापूर्वी प्रतिबंधक कारवाई (Preventive Action) करण्यात आली होती. मात्र त्यांच्यामध्ये काहीच सुधारणा झाली नाही.

 

आरोपींनी 27 मार्च रोजी हॉटेल प्यासा येथे एका व्यक्तीसोबत वाद घालून बेदम मारहाण केली होती. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. फिर्यादी यांना गुन्हेगारी टोळीचा सदस्य जय निकम (Jai Nikam) याने मारहाण (Beating) केली तर टोळी प्रमुख प्रशांत जाधव याने जीवे मारण्याच्या उद्देशाने (Attempts to Kill) फिर्यादी यांच्या डोक्यात रॉड मारुन गंभीर जखमी केले होते. तसेच इतर दोन साथीदारांनी फिर्यादी यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले होते. पोलिसांनी आरोपींविरुद्ध आयपीसी 307, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

 

दाखल गुन्ह्यातील आरोपींवर यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील त्यांच्यात सुधारणा झाली नाही. त्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त परीमंडळ 2 सागर पाटील (DCP Sagar Patil) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale) यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला अपर पोलीस आयुक्तांनी मंजूरी दिल्याने आरोपींविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण (Swargate Division ACP Sushma Chavan) करीत आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आयुक्तांची 82 वी मोक्का कारवाई
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत.
शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 82 तर चालु वर्षात 19 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

 

Web Title :- Pune Crime | MCOCA Mokka Action On Criminal Prashant Jadhav and his gang in Pune ! 82nd MCOCA action of Pune Police Commissioner Amitabh Gupta till date

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | बालेवाडी परिसरातील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 4 दलालांना अटक

MPSC Develops Mobile App | विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी MPSC ने तयार केले मोबाईल ॲप

PAN Card New Rule | घरबसल्या करता येणार PAN कार्डमध्ये बदल; नेमकी प्रक्रिया काय आहे? जाणून घ्या

 

Related Posts