IMPIMP

CM Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांचे ‘एका दगडात दोन पक्षी’, गडचिरोलीत नक्षलवाद्यांना इशारा देताना उद्धव ठाकरेंवर देखील साधला निशाणा

by nagesh
CM Eknath Shinde | had there not been a change today would not have the enthusiasm says eknath shinde on pratapgad for shivpratap din

गडचिरोली : सरकारसत्ता ऑनलाइन – CM Eknath Shinde | मला भीती असती तर मी गडचिरोलीत (Gadchiroli) आलोच नसतो. मी कधीच कुणाला घाबरलो नाही. परिस्थितीला तोंड देण्याचे काम केले म्हणून तर मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नक्षलवाद्यांना (Naxalite) इशारा देतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena chief Uddhav Thackeray) यांनाही टोला लगावला. ते गडचिरोलीत पत्रकारांशी बोलत होते. आधीच्या सरकारमध्ये शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री (Guardian Minister) होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गडचिरोलीत नक्षलवाद्यांशी दोन हात करणारे जवान आणि पोलिसांसोबत (Gadchiroli Police) दिवाळी (Diwali Festival) साजरी केली. छत्तीसगडच्या बॉर्डरवरील (Chhattisgarh Border) जंगलात येऊन त्यांनी सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. तसेच जवानांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले, मला भीती असती तर मी गडचिरोलीत आलोच नसतो. मी कधीच कुणाला घाबरलो नाही. परिस्थितीला तोंड देण्याचे काम केले म्हणून तर मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो.

 

ते पुढे म्हणाले, आपले जवान कसे काम करतात, कोणत्या परिस्थितीत करतात हे पाहिले पाहिजे. तसेच जवानांच्या पाठी सरकार खंबीर आहे हा मेसेज गेला पाहिजे. आपले जवान आणि गृहखाते नक्षल्यांना मुँह तोड जवाब द्यायला तयार आहे. या जंगलात नक्षलवाद्यांचा वावर असतो. गेल्या काही वर्षात नक्षलवाद कमी होत आहे. आपले जवान काम करत आहेत. त्यांनी आपला प्रभाव दाखवला आहे. आपल्याला आपल्या बॉर्डरही सेफ करायच्या आहेत.

 

शिंदे (CM Eknath Shinde) पुढे म्हणाले की, या भागात पोलीस स्टेशनचे (Police Station) उद्घाटन झाले आहे.
हा नक्षलग्रस्त भाग आहे. मी इथे आलो आहे. ज्या परिस्थितीत आपले जवान काम करत आहेत, राज्याच्या बॉर्डरचे रक्षण करत आहेत,
स्वत:चा जीव धोक्याक घालत आहेत, त्यांना सण उत्सावाचा आनंद मिळत नाही, आपल्या कुटुंबापासून दूर राहून ते कर्तव्य बजावत असतात,
त्यामुळे त्यांना भेटायला आलो आहे. त्यांच्याशी बोलायला आला आहे. त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करायला आलो आहे.
मी पालकमंत्री असतानाही जवानांसोबत दिवाळी साजरी केली. आज मुख्यमंत्री असताना दिवाळी साजरी करतोय याचा आनंद आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- CM Eknath Shinde | cm eknath shinde visit gadchiroli naxalite area

 

हे देखील वाचा :

Devendra Fadanvis | दुसरा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, फडणवीसांनी दिले स्पष्ट संकेत

Mumbai Crime | फटाके फोडण्याच्या वादातून 3 अल्पवयीन मुलांनी केला तरुणाचा खुन, गोवंडी परिसरातील धक्कादायक घटना

Pune Crime | एसटी प्रवासात कुरिअर बॉयचे 24 लाख लुटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

 

Related Posts