IMPIMP

Pune Crime | पुणे प्रादेशिक परिवहन (RTO) अधिकार्‍याला मागितली 1 कोटी रुपयांची खंडणी; गुन्हा मागे घेण्यासाठी पैसे गोळा करुन देण्याची मागणी, जाणून घ्या प्रकरण

by nagesh
 Pune RTO | Call for tarpaulin covering while transporting minor mineral

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | भावाने बनावट सही (Bogus Signature) करुन गाडी विकल्याच्या प्रकरणात आरटीओ अधिकार्‍यांना (Pune RTO) त्याने आरोपी केले. ही तक्रार मागे घेण्यासाठी तुम्ही एक कोटी रुपये गोळा करुन द्या, अशी खंडणी (Ransom) प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांकडे केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात सरकारी अधिकार्‍यांवरील दोषारोप (Chargesheet) दाखल करण्यास लवकर परवानगी मिळावी, यासाठी त्याने सर्व अधिकार्‍यांना ई मेल पाठविले असून त्यात राज्य घटनेबाबत अश्लिल आणि अवमानकारक भाषा वापरली आहे. बंडगार्डन पोलिसांनी (Bund Garden Police Station) त्याला अटक केली आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सचिन काशीनाथ गव्हाणे Sachin Kashinath Gawhane (रा. राजगुरुनगर – Rajgurunagar) असे त्याचे नाव आहे.
त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे (RTO Ajit Shinde) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १८५/२२) दिली आहे.
हा प्रकार १० मे २०२१ ते २७ जून २०२२ दरम्यान घडला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन गव्हाणे याचा ट्रक त्याचा भाऊ समीर याने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथे अर्ज करुन त्यावर सचिन याची स्वत:च सही करुन कागदपत्रे सादर केली.
सचिन याची गाडी विशाल टाव्हरे याच्या नावे करुन दिली.
याप्रकरणी सचिन याने भोसरी एमआयडीसी (Bhosari MIDC Police Station) येथे फिर्याद दिली होती.
त्यावरुन त्याचा भाऊ समीर व तसेच तत्त्कालीन सहायक परिवहन अधिकारी सुबोध मिर्चीकर व इतर अधिकारी, कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
२०१९ मध्ये हा गुन्हा दाखल केला गेला आहे.
याप्रकरणात पोलिसांनी तपास करुन परिवहन आयुक्त मुंबई (Transport Commissioner Mumbai Maharashtra) यांच्याकडे दोषारोप दाखल करण्याची परवानगी बाबत प्रस्ताव सादर केला आहे.
तो प्रलंबित आहे. याप्रकरणात सचिन याने वेगवेगळ्या कार्यालयामध्ये केलेल्या ई मेल व तक्रारी अर्जांमध्ये परिवहन अधिकारी व कर्मचारी विरुद्ध तक्रारी केल्या आहेत.

 

तसेच दोषारोप दाखल करण्यास लवकर परवानगी द्यावी, यासाठी तो सातत्याने ई मेल करीत असतो.
गेल्या वर्षीपासून त्याने फिर्यादी अजित शिंदे यांच्या कार्यालयात येऊन आपण अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारी बंद करण्यासाठी या अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून १ कोटी रुपये घेऊन देण्यासाठी मागणी शिंदे यांच्याकडे केली.
शिंदे यांनी सुरुवातीला त्याच्याकडे दुर्लक्ष केले.
त्यानंतर ते यावर काही बोलत नाही,
हे लक्षात आल्यावर त्याने स्वत:च ८५ लाख रुपये एकतर्फी रक्कम निश्चित करुन ही रक्कम फिर्यादी शिंदे यांनी गोळा करुन द्यावी,
अशी वारंवार मागणी केली.
शिंदे यांनी त्याला नकार दिला असता त्याने “गव्हाणेला पुढे जाऊन तुमच्याविरुद्ध काय बोलायला लागेल,” असे करु नका,
अशी धमकी दिली.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सचिन गव्हाणे याने १ जून रोजी एक ईमेल फिर्यादी व अन्य सरकारी कार्यालयास पाठविले.
त्यात त्याने राज्यघटनेबाबत अवमानकारक उल्लेख केला आहे.
तसेच फिर्यादी यांच्याविषी बदनामीकारक व अश्लिल मजकूर लिहिला आहे,
त्यामुळे शेवटी शिंदे यांनी पोलिसांकडे तक्रार केली.
पोलिसांनी IPC 385, 500, 34 सह राष्ट्र प्रतिष्ठा अपमान प्रति अधिक 1971 कलम 2 सह IT Act 67 अन्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक सातपुते अधिक तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Ransom of Rs 1 crore demanded from Pune Regional Transport (RTO) officer
Demand to raise money to withdraw the crime know the case

 

हे देखील वाचा :

Pune News | शुक्रवार पेठेतील जुन्या वाड्याचा जिना, भिंतीचा काही भाग कोसळला; अग्निशमन दलाने अडकलेल्या 6 रहिवाशांंची केली सुटका

Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचा बंडखोर आमदारांना टोला; म्हणाले – “तर लगेच त्यांची आमदारकी रद्द होईल, कोर्टातही जावं लागणार नाही”

Cloudburst Near Amarnath Cave | अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीमुळे मोठी दुर्घटना; 15 जणांचा मृत्यू, 40 जण बेपत्ता

 

Related Posts