IMPIMP

Pune Crime | तोतया पोलिसाने पोलीस भरतीच्या नावाखाली तरुणांची केली फसवणूक

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Cyber Police Station - Woman cheated in the name of selling furniture in the name of Facebook friend

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | पोलीस गणवेशात (Police Uniform) वावरुन अनुकंपा तत्त्वावर (On The Principle Of Compassion) पोलिसांची नोकरी (Police Job) लावून देतो, असा बनाव करुन एका तोतया पोलिसाने अनेक तरुणांची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला ज्या रुमवर तो राहत होता, तेथील तरुणांचे पैसे आणि लॅपटॉपही (Laptop) त्याने चोरुन नेला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी एका २६ वर्षाच्या तरुणाने वारजे पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २२२/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी चिन्मय मोहन देवकाते Chinmay Mohan Devkate (रा. ता. म्हाडा, जि. सोलापूर – Solapur) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार हिंगणे येथील हिंगणे होम कॉलनीत २७ एप्रिल ते १८ मे दरम्यान घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी हे आपल्या तीन मित्रांसह हिंगणे होम कॉलनीत (Hingne Home Colony) राहत होते.
त्यांच्याकडे एक जण आपण पोलीस असल्याचे सांगून रहायला आला.
तो नेहमी पोलीस गणवेशात वावरत होता. त्यामुळे सर्वांना त्याच्यावर विश्वास बसला.
त्याने रुममधील रुमपार्टनर व मेसमधील इतरांना आपण पोलीस असल्याचे सांगितले.
पोलीस खात्यातील वरिष्ठांशी आपले चांगले संबंध असून त्या संबंधावरुन आपण डायरेक्ट अनुकंपा तत्वावर वरिष्ठांना पैसे देऊन पोलिसांची नोकरी लावून देतो, असे सांगितले.
त्यांच्यातील ५ जणांकडून त्याने १ लाख १० हजार रुपये पोलीस भरती होण्यासाठी घेतले.
या मित्रमैत्रिणींना संशय येण्यास सुरुवात झाल्यावर तो जेवण करुन येतो, असे सांगून निघून गेला. तो परत आला नाही.
दरम्यान रुम बंद असताना तो रुमवर येऊन आतील फिर्यादी यांचा लॅपटॉप व मित्राचा मोबाईल चोरी करुन पळून गेला.
पोलीस उपनिरीक्षक होळकर अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :-  Pune Crime | Totaya Bogus police cheated the youth in the name of police recruitment

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :


 

 

Related Posts