IMPIMP

100 कोटी वसुलीच्या प्रकरणात CBI च्या तपासाला गती; अनिल देशमुखांच्या दोन PAचा जबाब नोंदवला

by Team Deccan Express
cbi has summoned two pa of former home minister anil deshmukh to record their statement

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसूल करण्याचा आरोप केला. यानंतर उच्च न्यायालयाने आरोप गंभीर असल्याने सीबीआयला cbi चौकशीचे निर्देश दिले. या प्रकरणी सीबीआयने तपासाला गती दिली असून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दिशेने एक-एक पाऊल पुढे टाकण्यास सुरुवात केली आहे. सीबीआयने आता अनिल देशमुख यांच्या दोन स्वीय सहाय्यकांना (PA) जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं आहे.

‘फडणवीसांच्या काळात 14 मंत्र्यांवर गंभीर आरोप होऊनही नैतिकतेनं सत्तेशी जणू ‘लव्ह जिहाद’ पुकारला होता’, संजय राऊतांचा टोला

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख यांचे दोन स्वीय सहाय्यक पलांडे आणि कुंदन हे दोघेही सीबीआयसमोर हजर झाले आहे. त्या दोघांचीही चौकशी सुरु असून सध्या त्यांचा जबाब सीबीआयचे cbi अधिकारी नोंदवून घेत आहेत. त्यामुळे आता पुढचा नंबर अनिल देशमुख यांचा असणार का ? असा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे.

परमीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटींच्या गंभीर आरोपांचा तपास सीबीआय cbi करत आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांनी मुंबई पोलीस दलातील एपीआय सचिन वाझे यांना 100 कोटी वसूल करण्यास सांगितले होते. असा खळबळजनक आरोप केला होता. याच पत्रामध्ये परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यांसोबत सचिन वाझे यांची काय बोलणी झाली होती याचा तपशील दिला होता.

गुजरात भाजप ऑफिसमधून रेमडेसिवीर इंजेक्शनचे मोफत वाटप, नवाब मलिकांचा गंभीर आरोप

दरम्यान, सचिन वाझे याने एनआयए कोर्टाला पत्र दिले होते. या पत्रात त्यांनी अनिल देशमुख यांनी पैशांची मागणी केल्याचा उल्लेख केला होता. तसेच त्यांच्या स्वीय सहाय्यकाचे नाव देखील घेतले होते. हे आरोप लक्षात घेता सीबीआयने cbi देशमुखांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं आहे. त्यांच्या जबाबातून अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर येणार आहेत. या वेळी अनिल देशमुख यांचे दोन्ही स्वीय सहाय्यक काय जबाब देतात यावर अनिल देशमुख यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

यापूर्वी सीबआयने 8 एप्रिल रोजी एनआयए कोठडीत असलेले सचिन वाझे, सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्यासह मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबीर सिंह आणि याचिकाकर्ते जयश्री पाटील यांचा जबाब नोंदवला होता. आता या चारही जणांच्या जबाबानंतर सीबीआयने एक पाऊल टाकत देशमुख यांच्या दोन स्वीय सहाय्यकांना जबाबासाठी बोलावले आहे.

Read More : 

सचिन वाझे प्रकरणावरुनही उदयनराजे आक्रमक, म्हणाले, ‘हा कोण वाझे…’

संजय राऊतांनी फडणवीसांना दिला सल्ला, म्हणाले – ‘प्रसंग बाका, सरकार कोणाचं हे पाहू नका, दिल्लीतून महाराष्ट्राला मदत मिळवून द्या’

15 लाखांची लाच घेताना आयकर विभागातील 2 अधिकारी CBI च्या जाळ्यात

Balasaheb Thorat : ‘राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आरोपांना महत्व देत नाही’

राज्यात 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण Lockdown ? मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर
होऊ शकतो निर्णय

खा. विनायक राऊतांचा राणेंवर ‘निशाणा’, म्हणाले – ‘कोकण सम्राटां’ नी चिपी विमानतळाचं कंत्राट दळभद्री कंपनीला देऊन वाट लावली

Related Posts