IMPIMP

Modi Hatao, Desh Bachao | आम आदमी पक्षातर्फे आज देशभरात ‘मोदी हटवा, देश वाचवा’ पोस्टर लावण्याची मोहीम

by nagesh
Modi Hatao, Desh Bachao | Aam Aadmi Party campaign to put up 'Modi Hatwa, Desh Vachwa' Modi Hatao, Desh Bachao Modi Hatao, Desh Bachaoposters across the country today

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – AAP On Modi Govt | आम आदमी पार्टी Aam Aadmi Party (AAP) तर्फे संपूर्ण देशभरात “मोदी हटवा, देश वाचवा” (Modi Hatao, Desh Bachao) हे पोस्टर लावण्याची मोहीम आज (दि. 30 मार्च) हातामध्ये घेण्यात आली असून मोदी सरकारच्या (Modi Govt) संविधान विरोधी व जनविरोधी धोरणांचा, दमनकारी पद्धतींचा, महागाईचा, भ्रष्टाचाराचा व काही मोजक्या बड्या उद्योगपतींचे हित सांभाळण्याच्या कृतीचा विरोध दर्शवण्यात येत आहे. देशभरातील 11 प्रमुख भाषांमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलगू, मल्याळम, कन्नड, ओडिया, गुजराती, पंजाबी, उर्दू व बांगला या भाषेमध्ये हे पोस्टर्स बनवण्यात आले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पुण्यामध्ये देखील अनेक ठिकाणी “मोदी हटवा, देश वाचवा” असे बॅनर्स लावण्यात आले आहेत. पुण्यामध्ये आम आदमी पक्षाचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार (AAP Vijay Kumbhar) यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरामध्ये नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. आज याबाबत पत्रकार भवन, नवी पेठ येथे पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली या पत्रकार परिषदेला आम आदमी पक्षाचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार, जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत (AAP Mukund Kirdat), जिल्हा संघटन मंत्री व पुण शहर निवडणूक समन्वयक डॉक्टर अभिजीत मोरे (AAP Dr. Abhijit More), पुणे शहर संघटक एकनाथ ढोले (AAP Eknath Dhole), पुणे शहर सहसमन्वयक सुजित अग्रवाल (AAP Sujit Agarwal), आनंद अंकुश (AAP Anand Ankush), किशोर मुजुमदार (AAP Kishor Mujumdar), वैशाली डोंगरे (AAP Vaishali Dongre) यांनी संबोधित केले. (Modi Hatao, Desh Bachao)

 

स्वातंत्र्यसंग्रामाच्या लढाईमध्ये अनेक शहीद हसत हसत फासावर चढले. त्या शहिदांचं स्वप्न होतं की जेव्हा भारत देश स्वतंत्र होईल तेव्हा देशातून अज्ञान दूर होईल आणि भारत एक शिक्षित प्रगत राष्ट्र बनेल. आजारी लोकांना उपचार करण्यासाठी पैसे अभावी दारोदार भटकण्याची गरज पडणार नाही. तरुणांना रोजगार मिळेल. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचं उत्तम मूल्य मिळेल… परंतु, मोदी सत्तेवर असताना हे स्वप्न मात्र काही केल्या पूर्ण होऊ शकत नाही. (Modi Hatao, Desh Bachao)

 

जेव्हा इंग्रज सरकारची राजवट होती तेव्हा कुठलेही पत्र काढता येत नव्हतं, पेपर छापता येत नव्हता. पत्रके वाटता येत नव्हती.. कारण त्यावर इंग्रजांनी बंधने आणली होती. स्वातंत्र्याच्या लढ्यातील वीर स्वातंत्र्य सैनिकांचा आवाज दाबण्यासाठी इंग्रजांनी अनेक चुकीचे अन्यायकारक कायदे बनवले आणि आज तशाच पद्धतीने अन्यायकारक कायद्यांचा आधार घेत देशातील सामान्य जनतेचा गळा घोटला जातोय.

 

दिल्लीमध्ये “मोदी हटाव, देश बचाव” हे पोस्टर लागले आणि मोदींची राजवट घाबरली. तब्बल 138 एफ आय आर दिल्लीमध्ये नोंदवल्या गेल्या. इंग्रजांच्या राजवटीमध्ये देखील एका पोस्टरसाठी कधीही एवढ्या एफआयआर नोंदवल्या गेल्या नाहीत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आज देशातील संविधान पायदळी तुडवले जात आहे. विरोधी पक्षांचा आवाज दाबण्यासाठी त्यांना खोट्या पोलीस
केसेस मध्ये फसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशातील शेतकऱ्यांवर जबरदस्ती तीन काळे कायदे थोपवण्यात
आले होते. त्या विरोधात जिगरबाज शेतकऱ्यांनी तब्बल एक वर्ष आंदोलन केलं.
या आंदोलनामध्ये 700 हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.
हे आंदोलन मागं घेताना सरकारने शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की, देशातील शेतकऱ्यांना किमान आधारभूत
किंमत म्हणजेच मिनिमम सपोर्ट प्राईस याला कायदेशीर अधिष्ठान दिले जाईल. परंतु अद्यापही तसे झालेले नाही.

 

देशातील विद्यार्थ्यांचा आवाज त्यांना देशद्रोही आतंकवादी असे संबोधन दाबला जात आहे.
देशातील कामगार अतिशय वाईट परिस्थितीमध्ये जीवन जगत आहेत.
ज्या सेंट्रल असेंबली मध्ये भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी कामगार विरोधी सेफ्टी बिल निषेध करण्यासाठी
बॉम्ब फेकले होते, त्याच आपल्या देशातील संसदेत आज दुर्दैवाने कामगारांचे सर्व हक्क व त्यामागचे कायदे
संपवून त्यांना केवळ चार कामगार संहितांमध्ये संकुचित केले आहे.

 

जिथे जिथे प्रधानमंत्री मोदी गेले, त्या त्या ठिकाणी अडाणी यांच्या साम्राज्याचा विस्तार सरकारच्या मदतीने केला गेला.
नरेंद्र मोदी जोपर्यंत प्रधानमंत्री आहेत तोपर्यंत ते अडाणीची निष्पक्ष चौकशी होऊ देतील का? हा प्रश्न देशवासीयांच्या पुढे आहे.

 

आम्ही प्रार्थना करत आहोत की स्वातंत्र्य सैनिकांची विरासत आम्हाला या हुकूमशाही विरोधात लढण्याची प्रेरणा
देईल आणि स्वातंत्र्यसंग्रामात अपेक्षित असलेली मूल्य टिकवण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Modi Hatao, Desh Bachao | Aam Aadmi Party campaign to put up ‘Modi Hatwa, Desh Vachwa’ Modi Hatao, Desh Bachao Modi Hatao, Desh Bachaoposters across the country today

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | ‘…त्यांना कोर्टाची कारवाई समजत नाही’, विरोधकांच्या ‘त्या’ टिकेवरुन देवेंद्र फडणवीसांचा टोला (व्हिडिओ)

Devendra Fadnavis | छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात राडा, देवेंद्र फडणवीसांचे नागरिकांना आवाहन, म्हणाले – ‘परिस्थिती नियंत्रणात, सर्वांनी शांतता राखावी’ (व्हिडीओ)

Ajit Pawar | ‘न्यायालयाने नपुंसक म्हणणं हा महाराष्ट्राचा अपमान नाही का?’, अजित पवारांचा सरकारला संतप्त सवाल

 

Related Posts