IMPIMP

Pathaan Hindi Movie | ‘पठाण’ सिनेमाच्या वादावर पुष्कर श्रोत्रींचे राम कदमांना उत्तर, म्हणाले…

by nagesh
Pathaan Hindi Movie | marathi actor pushkar shrotri challenge ram kadam amid pathan controversy deepika padukone for besharam rang

सरकारसत्ता ऑनलाईन  –  सर्वत्र सध्या शाहरूख खानच्या ‘पठाण’ (Pathaan Hindi Movie) या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. या चित्रपटामधील ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिका आणि शाहरूख खान यांचा बोल्ड डान्स तसेच या गाण्यात दीपिकाने परिधान केलेली बिकीनी यावरून सध्या प्रचंड वाद सुरू आहे. त्यातच भाजपा नेते राम कदम यांनी ‘पठाण’ (Pathaan Hindi Movie) या सिनेमावर ट्वीट करत सिनेमा बंदीची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीवर अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी त्यांना उत्तर दिले आहे.

 

‘पठाण’ (Pathaan Hindi Movie) या सिनेमाला वाढता विरोध पाहता भाजपा नेते राम कदमांनी एक ट्वीट केले होते. ज्यामध्ये त्यांनी लिहीले आहे की, ‘अनेक साधू संत महात्म्यांसहित अनेक हिंदू संघटना या चित्रपटास विरोध करत आहेत. आणि महाराष्ट्रात सध्या हिंदुत्वाची विचारधारा असलेले सरकार आहे. अधिक बरे राहील जर या सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शकांनी समोर येत त्यांची भूमिका स्पष्ट करावी. साधू संतांनी जे आक्षेप नोंदवले आहेत त्यावर त्यांचे म्हणणे काय आहे हे जनतेसमोर यावे. मात्र महाराष्ट्राच्या भूमीवर हिंदुत्वाचा अपमान करणारी कोणतीही फिल्म वा सिरीयल चालू देणार नाही. जय श्रीराम..’

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राम कदम यांच्या ‘पठाण’ (Pathaan Hindi Movie) या चित्रपटावरील ट्वीटवर अभिनेते पुष्कर श्रोत्रींनी एका वाहिनीशी बोलताना म्हटले आहे की, ‘ कोविडकाळानंतर प्रेक्षक चित्रपटगृहाकडे पाठ फिरवू लागलेत याची मला एक कलाकार म्हणून धास्ती आहे. त्यांनी पूर्वीप्रमाणेच चित्रपटाचा आनंद घ्यावा, त्यासाठी मी काय करू शकतो याचा विचार मी कायम करत असतो. कपड्याच्या रंगांचा विषय हा किरकोळ असून त्या गाण्यात दीपिका पादुकोणने अनेक रंगाचे कपडे घातले आहेत. सोनेरी, पिवळा, निळा, सप्तरंगी असे अनेक रंग घातलेत. त्यामुळे रंगावर प्रत्येक धर्माचा किंवा पक्षाचा हक्क असू शकत नाही.’ असे म्हणत त्यांनी या सिनेमातील वेशभूषेची पाठराखन केली आहे.

 

पुढे बोलताना पुष्कर म्हणाले, राजकारणी कोणीही असो त्यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली आहे.
पण प्रत्येकवेळी सिनेमात काहीतरी चुकीचे आहे म्हणत तो सिनेमा बायकॉट करण्याची मागणी करणे देखील
चुकीचेच आहे. निर्माते स्वतःच घर गहान टाकून सिनेमे बनवत असतात. राम कदम साहेब,
तुम्ही संत महात्म्यांना पाठिंबा देताय ही गोष्ट चांगली आहे.
पण गाण्यात दिपीकाने विविध रंगांचे कपडे घातलेत पण या रंगावर माझा हक्क आहे. असे आपण म्हणू शकत नाही.
तसेच सोशल मिडीयावरती चर्चेत राहण्यासाठी या गोष्टी केल्या जात आहेत.
कंपनीकडून दोन जीबी डेटा मला फुकट मिळतोय. त्यामुळे मी लेखक, दिग्दर्शक आणि न्यायाधिश झालोय,
मी सांगतो म्हणून बायकॉट करा असं म्हणण्याचा अधिकार कोणालाही नाही.
असे पुष्कर श्रोत्री म्हणाला. त्याने हे वक्तव्य ‘पठाण’ (Pathaan Hindi Movie) या सिनेमावर होत असलेल्या टीकेबाबत केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pathaan Hindi Movie | marathi actor pushkar shrotri challenge ram kadam amid pathan controversy deepika padukone for besharam rang

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील यांना पुन्हा शाई फेकण्याची धमकी, पुण्यात गुन्हा दाखल

Shah Rukh Khan | ‘पठाण’ चित्रपटाच्या वादादरम्यान शाहरुख खानचा जुना व्हिडीओ व्हायरल; बॉयकॉटबाब केलं होतं भाष्य

Pune Crime | अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन अ‍ॅसिड फेकण्याची धमकी, 42 वर्षीय आरोपी गजाआड; येरवडा परिसरातील घटना

Prashant Damle | ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटकाला फालतू आणि दर्जाहीन म्हणणाऱ्याला प्रशांत दामलेनी सुनावले खडेबोल

 

Related Posts