IMPIMP

6 लाखाच्या फायद्यासाठी Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये करा गुंतवणूक; 5 वर्षातच मिळेल मोठा रिटर्न, जाणून घ्या

by nagesh
Post Office Rules | post office change rules for close your account check new rules

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  Post Office च्या योजनांमध्ये एक नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) आहे जिथे एफडीच्या तुलनेत चांगले व्याज मिळत आहे. या स्कीममध्ये 100 रुपयांपेक्षा सुद्धा कमी गुंतवणूक करता येऊ शकते. पैसे पूर्ण सुरक्षित असल्याने सुद्धा पोस्ट ऑफिसची (Post Office) ही स्कीम चांगला पर्याय आहे. यामध्ये जमा रक्कमेवर सॉवरेन गॅरंटी असते.

 

 

व्याजदर –

NSC योजनेत सध्या 6.8 टक्के दराने व्याज मिळत आहे. हे वार्षिक हिशेबाने कंपाऊंड केले जाते.
परंतु पेमेंट मॅच्युरिटीच्या वेळीच होते. स्कीमचा कालावधी 5 वर्षाचा आहे.
मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर तो आणखी 5 वर्षांनी वाढवता येऊ शकतो.

 

 

गुंतवणुकीचे 5 पर्याय –

नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट सध्या 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, 5000 रुपये आणि 10,000 रुपयांच्या मुल्यात उपलब्ध आहेत.
वेगवेगळ्या किमतीचे कितीही सर्टिफिकेट खरेदी करून एनएससीमध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते.
यामध्ये मिनिमम 100 रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे.
कमाल गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

कसा मिळेल 6 लाखाचा फायदा-

जर तुम्ही योजनेत 15 लाख रुपये गुंतवले तर 6.8 टक्के व्याजदराने ते 5 वर्षात 20.85 लाख रुपये होतील. यामध्ये गुंतवणूक 15 लाख असेल, परंतु व्याजाच्या रूपात सुमारे 6 लाख रुपयांचा फायदा होईल.
इन्कम टॅक्स अ‍ॅक्ट 1961 च्या सेक्शन 80सी अंतर्गत एनएससी अंतर्गत 1.5 लाख रुपये वार्षिक गुंतवणुकीवर टॅक्स कपातीचा लाभ मिळतो.

 

 

पोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग स्कीम्स –

या आठ स्कीमच्या यादीत पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट, पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाऊंट,पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट, पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम, पोस्ट ऑफिस पब्लिक प्रोव्हिडंट फंड, पोस्ट ऑफिस सीनियर सिटिजन्स सेव्हिंग्ज स्कीम, पोस्ट ऑफिस सुकन्या समृद्धी खाते आणि
पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा समावेश आहे.

 

 

Web Title : Post Office | earn 6 lakh rupees benefits to invest post office saving schemes check all details here

 

हे देखील वाचा :

Pune Crime Branch Police | नागरिकांचे मोबाईल हिसकावणारी दुकली गुन्हे शाखेकडून गजाआड, एक लाखाचा मुद्देमाल जप्त

Modi Government | 1 ऑक्टोबरपासून कार्यालयाची वेळ होईल 12 तासांची, ‘OT’ चे मिळणार पैसे आणि वाढणार PF, जाणून घ्या नवीन बदल

Alert ! 30 सप्टेंबर नंतर तुम्ही करू शकणार नाही कोणतेही ट्रांजक्शन, अडकतील सर्व पैसे, जाणून घ्या काय आहे कारण?

 

Related Posts