IMPIMP

Pune Crime | शारीरीक संबंध ठेवून लग्नास नकार दिल्याने 32 वर्षीय तरुणीची आत्महत्या; विश्रांतवाडी परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime | A 17-year-old girl committed suicide by hanging herself due to her child's trouble, an incident in Chandannagar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | विवाहविषयक वेबसाईटवर ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) तिच्याशी त्याने शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवले. त्यानंतर लग्नास टाळाटाळ करु  लागल्याने मानसिक तणावातून तरुणीने विषारी औषध पिऊन आत्महत्या (Suicide In Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी (Vishrantwadi Police) शंतनु संजय साळुंखे (रा. हेरंब सोसायटी, कामगारनगर, टिळकनगर, कुर्ला, मुंबई) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुनावळे येथील एका ३८ वर्षाच्या तरुणाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २३०/२२) दिली आहे. (Pune Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहिण (वय – ३२) ही धानोरी येथे राहत होती.
तिची जीवनसाथी मेट्रीमनी या वेबसाईटवर आरोपी शंतनु साळुंखे याच्याबरोबर ओळख झाली.
त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरीक संबंध ठेवले.
तिने लग्नाबाबत विचारल्यावर तो टाळाटाळ करु लागला. त्याच्या त्रासाला कंटाळून तिने २६ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता मानसिक तणावातून विषारी औषध पिले.
तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरु असताना ३० ऑगस्ट रोजी तिचा मृत्यु झाला.
पोलिसांनी शंतनु साळुंखे याच्यावर गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत.

 

Web Title : –  Pune Crime | 32 year old woman commits suicide after refusing to marry after physical relationship Incidents in Vishrantwadi area

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील बिल्डरवर कुर्‍हाडीने हल्ला

Battery Cell Production मध्ये देशाला आत्मनिर्भर बनवण्याची तयारी, 2030 पर्यंत होईल 9 बिलियन डॉलरची गुंतवणूक

Tata Steel | ट्विन टॉवर पाडणार्‍या कंपनीचे लक्ष आता टाटा स्टीलवर, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण…

Ramdas Kadam | ‘मातोश्रीवर किती खोके गेले माहिती, तोंड उघडायला लावू नका’, रामदास कदमांचा इशारा

Related Posts