IMPIMP

Rain in Maharashtra | विकेंडनंतर राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, हवामान खात्याकडून अलर्ट जारी

by nagesh
Weather Update | temperature rise in vidarbha rainfall possibilities in konkan imd report today

मुंबई न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन –  मागील काही दिवसांपासून राज्यात मान्सूनसाठी (Rain in Maharashtra) अनुकूल हवामान नसल्याने पावसाने दडी मारली आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता पुन्हा राज्यात मान्सूनची (Rain in Maharashtra) वापसी होण्याची शक्यता आहे. या विकेंडनंतर राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची (Rain Possibilities After Weekend) शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. राज्यातील जवळपास 16 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट (Yellow alert) देण्यात आला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विकेंडनंतर सोमवारी (दि.16) कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या
जिल्ह्यांत विजांच्या कडकडासाह वेगवान वाऱ्याच्या साथीने जोरदार पावसाची शक्यता आहे.
या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
तर पुणे, औरंगाबाद, अहमदनगर आणि जालना या चार जिल्ह्यांत विजांचा कडकडाट होणार आहे.
त्यामुळे हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

‘या’ ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस

मंगळवारी देखील राज्यात पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची (light to moderate rain) शक्यता आहे.
मंगळवारी पुण्यासह (Pune) 14 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
आंध्र प्रदेशात हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं दक्षिण मराठवाड्यात जोरदार पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.

आज पुण्यात पावसाची शक्यता

काल पुण्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत.
आजही मुंबई आणि ठाणे परिसरात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
याशिवाय पुणे जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तर पुणे घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी लावण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Web Title : Rain in Maharashtra | rain possibilities in maharashtra after weekend imd gives alert to marathawada and vidarbha

हे देखील वाचा :

Fact Check | Tokyo Olympics मध्ये ‘गोल्ड मेडल’ जिंकण्याच्या खुशीमध्ये भारत सरकार देतंय 12 महिन्यांचा Free Recharge? जाणून घ्या ‘सत्य’

Cyberchondria | इंटरनेटवर आजारांबाबत शोध घेण्याने वाढून शकते तुमचे आजारपण, जाणून घ्या कसे?

Pune Crime | अमेरिकन कंपनीच्या फसवणूकप्रकरणी ‘पॅकस्पेस एंटरप्राइजेस’च्या हार्दिक ओसवाल, दीपक सुतार आणि प्रदीप तांगडे यांच्याविरूध्द गुन्हा

Related Posts