IMPIMP

Tax Benefits on Home Loan | फायद्याची गोष्ट ! होम लोनवर कशाप्रकारचे मिळतात TAX बेनिफिट्स, जाणून घ्या सविस्तर

by nagesh
Central Civil Services (Conduct) Rules | central government employees civil services conduct rules 1964 for purchasing of house flat or plot

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  Tax Benefits on Home Loan | होम लोनचे दर आतापर्यंतच्या खालच्या स्तरावर आहेत. दुसरीकडे रियल इस्टेटसुद्धा बुडालेले आहे. ज्यास सावरण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहे. जर तुम्ही एखाद्या होम लोनचे पेमेंट करत असाल किंवा नुकतेच एखादे होम लोन घेतले असेल तर तुम्ही इन्कम टॅक भरताना बेनिफिट प्राप्त करू शकता. अखेर होम लोनवर कशाप्रकारे टॅक्स बेनिफिट मिळवू शकता (Tax Benefits on Home Loan) ते जाणून घेवूयात.

 

प्रिन्सिपल अमाऊंटवर केलेले पेमेंट

घर खरेदी किंवा बांधकामासाठी घेतलेल्या होम लोनच्या कलम 80सी अंतर्गत प्रिन्सिपल अमाऊंटचे केलेले पेमेंट टॅक्स बेनिफिटच्या कक्षेत येते (tax benefits on home loan). ज्यामध्ये टॅक्सपेयरला 1.5 लाख रुपयांचा फायदा मिळतो.

 

होम लोनच्या व्याजावर सुद्धा मिळतो फायदा (tax benefits on home loan interest)

प्राप्तीकर कायदा कलम 24 (बी) अंतर्गत, टॅक्सपेयर्स होम लोनवर दिलेल्या व्याजाविरूद्ध 2 लाख रुपयांच्या टॅक्स बेनिफिटचा दावा करू शकतात. हे बेनिफिट घराचे बांधकाम पूर्ण झाल्यावरच मिळते.

 

कलम 80EE

होम लोनवर भरलेल्या व्याजाच्या बदल्यात 50,000 रुपयांपर्यंतच्या अतिरिक्त कपातीच्या रूपात कलम 80ईई आर्थिक वर्ष 2017-18 पासून सादर केले गेले होते.

आर्थिक वर्ष 2016-17 च्या दरम्यान आर्थिक संस्थांद्वारे लोन मंजूर केले गेले असेल.

मंजूर कर्जाची रक्कम 35 लाख रुपयांपेक्षा कमी असावी.

निवासी मालमत्तेची किंमत 50 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावी.

जर या कलमांतर्गत एखाद्या कपातीचा दावा केला गेला तर एखाद्या दुसर्‍या तरतुदीअंतर्गत अशा प्रकारच्या व्याजाच्या कपातीची परवानगी मिळत नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

कलम 80EEA

कलम 80ईई अंतर्गत कमी किमतीच्या घरांसाठी बेनिफिट्स वाढवण्यासाठी आर्थिक वर्ष 2019-20 पासून कलम 80ईईए सादर करण्यात आले आहे. या कपातीचा दावा कलम 80ईईए अंतर्गत एका आर्थिक वर्षात कमाल 1.5 लाख रुपयांसाठी केला जाऊ शकतो. हे कलम 24 च्या अंतर्गत कमाल 2 लाख रुपयापेक्षा वेगळे आहे. अशाप्रकार, टॅक्सपेयर एक परवडणारे घर खरेदीच्या बाबतीत एका आर्थिक वर्षात 3.5 लाख रुपयांपर्यंत डिडक्शन क्लेम करू शकतो. दोन वेगवेगळ्या कलमांतर्गत एकाच रक्कमेचा दोनवेळा दावा केला जाऊ शकत नाही.

 

या अटी पूर्ण केल्यावर मिळते 1.5 लाख रूपयांची सवलत

होम लोन बँक किंवा हौसिंग फायनान्स कंपनीकडून घेतलेले पाहिजे.

होम लोन 1 एप्रिल 2019 ते31 मार्च 2021 च्या दरम्यान घेतलेले असावे.

स्टँप शुल्क 45 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

टॅक्सपेयर्सकडे कर्ज मंजूरीच्या तारखेपर्यंत कोणतीही निवासी संपत्ती नसावी.

वैयक्तिक टॅक्सपेयर कलम 80ईई अंतर्गत कपातीचा दावा करण्यासाठी पात्र नसावा.

हे टॅक्स बेनिफिट 1 एप्रिल 2017 च्यानंतर घेतलेल्या होम लोनसाठी उपलब्ध नाही.

 

एकुण 5 लाख रुपयांचा मिळू शकतो फायदा (5 lakhs tax benefits on home loan)

होम लोन संबंधित सर्व कपाती एकाचवेळी ठेवल्यास तुम्हाला कमाल 5 लाख रुपये (2 लाख रुपये कलम 24, 1.5 लाख रुपये कलम 80सी, आणि 1.5 लाख रुपये कलम 80ईईए) प्राप्त करण्यात मिळू शकते. जर नवीन घर खरेदी करण्याची योजना करत असाल तर खरेदीची योजना अशी बनवू शकता की लोन जास्त कपात प्राप्त करण्यात मदत करू शकते.

 

Web Title : Tax Benefits on Home Loan | what types of tax benefits are available on home loan know here

 

हे देखील वाचा :

Anti Corruption | 2 लाख 20 हजाराची लाच घेताना शाखा अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, प्रचंड खळबळ

Nitin Landge Bribe Case | …म्हणून न्यायालयाने पिंपरी मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगेंचा जामीन फेटाळला, येरवडा कारागृहात रवानगी

Bank Rules | SBI, HDFC, ICICI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! 30 सप्टेंबरला बंद होणार आहे ही सुविधा; जाणून घ्या

 

Related Posts