IMPIMP

IRDAI ने Bharti AXA-ICICI Lombard डील करता दिली मंजूरी, जनरल इन्श्युरन्स व्यवसायाच्या बाहेर पडणार ‘भारती एक्सा’

by nagesh
Police Inspector Transfer | kondhwa and faraskhana police station, two inspector transfer

नवी दिल्ली : वृत्तसंस्था IRDAI | प्रायव्हेट सेक्टरमधील जनरल इन्श्युरन्स कंपनी आयसीआयसीआय लोम्बार्ड (ICICI Lombard) ने शुक्रवारी म्हटले की, इन्श्युरन्स सेक्टरचे रेग्युलेटर आयआरडीएआय (IRDAI) ने भारती एक्सा जनरल इन्श्युरन्स (Bharti AXA) च्या जनरल इन्श्युरन्स उद्योगाला त्याच्यापासून वेगळे करून त्याच्यात सामावण्याच्या योजनेला अंतिम मंजूरी दिली आहे. आयसीआयसीआय लोम्बार्डने रेग्युलेटरी फायलिंगमध्ये ही माहिती दिली.

आयसीआयसीआय लोम्बार्डने म्हटले की, याबाबत कंपनीला 3 सप्टेंबर 2021 ला आयआरडीएआयकडून प्रस्तावित योजनेबाबत अंतिम मंजूरीचे पत्र मिळाले आहे. या योजनेसाठी प्रभावी तारीख 1 एप्रिल 2020 ठेवली होती.

 

आयसीआयसीआय लोम्बार्डमध्ये 30 टक्के भागीदारी

ICICI Lombard ने म्हटले की, जनरल इन्शुरन्स उद्योगाला वेगळे करणे आणि त्याच्या ट्रान्सफरला अंतिम मंजूरी मिळाल्याच्या तारखेपासून तीन दिवसांच्या आत सौदा प्रभावी होईल, जसे योजनेत म्हटले होते.

आयआरडीएआयने आयसीआयसीआय बँकेला आयसीआयसीआय लोम्बार्डमध्ये आपली भागीदारी कमी करून 30 टक्केवर आणण्याची सुद्धा मंजूरी दिली आहे. मात्र, हे काम विमा कायदा 1938 चे पालन आणि आवश्यक नियमांवर अवलंबून असेल.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

115 शेयरसाठी आयसीआयसीआय लोम्बार्डचे दोन शेयर

आयसीआयसीआय लोम्बार्डने मागच्या वर्षी भारती एंटरप्रायजेसकडून प्रमोटेड भारती एक्सा जनरल इन्श्युरन्सच्या अधिग्रहणाचा ठोस करार केला होता.
ही डील पूर्णपणे शेयरच्या व्यवहारात केली जाणार आहे.

दोन्ही कंपन्यांच्या संचालक मंडळाद्वारे मान्य केलेले शयर अदला-बदली फार्म्युल्यानुसार भारती एक्साच्या
शेयरधारकांना त्यांच्या प्रत्येक 115 शेयरसाठी आयसीआयसीआय लोम्बार्डचे दोन शेयर मिळतील.

– नॉन-लाईफ इन्श्युरन्स उद्योगातून बाहेर जाईल भारती एंटरप्रायजेस आणि एक्सा

सध्या भारती एंटरप्रायजेसकडे भारती एक्सा जनरल इन्श्युरन्सची 51 टक्के भागीदारी आहे तर उर्वरित 49 टक्के फ्रान्सची इन्श्युरन्स कंपनी एक्साकडे आहे.
वेगळे झाल्यानंतर भारती एक्सा जनरल इन्श्युरन्स कंपनी राहणार नाही.
भारती एंटरप्रायजेस आणि एक्सा दोन्ही नॉन-लाईफ इन्श्युरन्स उद्योगाच्या बाहेर जातील.

 

Web Title : Police Inspector Transfer | kondhwa and faraskhana police station, two inspector transfer

 

हे देखील वाचा :

Rupali Chakankar | ‘देशातील महिलांची फसवणूक केली म्हणून पंतप्रधानांवर गुन्हाच दाखल करायला हवा

6 लाखाच्या फायद्यासाठी Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये करा गुंतवणूक; 5 वर्षातच मिळेल मोठा रिटर्न, जाणून घ्या

Pune Crime Branch Police | नागरिकांचे मोबाईल हिसकावणारी दुकली गुन्हे शाखेकडून गजाआड, एक लाखाचा मुद्देमाल जप्त

 

Related Posts