IMPIMP

Raj Thackeray | राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट! उद्या कोर्टासमोर रहावे लागणार हजर

by nagesh
Raj Thackeray | raj thackeray demands ban on broadcasting politicians who use abusive language

बीड : सरकारसत्ता ऑनलाईन   मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट निघाले असून उद्या त्यांना बीडमधील परळी कोर्टात हजर रहावे लागणार आहे. चिथावणीखोर वक्तव्य आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी बसवर केलेल्या दगडफेकी प्रकरणी तारखेला सतत गैरहजर राहिल्याने परळी न्यायालयाने राज ठाकरे यांना अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. त्याच प्रकरणात जामीन घेण्यासाठी राज ठाकरे (Raj Thackeray) हे उद्या परळी कोर्टात हजर राहणार आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मनसे प्रमुख राज ठाकरे हे उद्या हॅलिकॉप्टरने सकाळी १० वाजता पांगरी येथील गोपीनाथगड येथे येणार आहेत. आणि त्यानंतर ते परळी कोर्टात जाणार आहेत. त्यानंतर मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन दुपारी दीड वाजता ते परत मुंबईसाठी रवाना होणार आहेत. २००८ साली राज ठाकरे यांना एका प्रकरणात मुंबईत अटक करण्यात आले होते. त्याचे पडसाद परळी येथे देखील पहायला मिळाले होते. परळी येथील धर्मापुरी पॉईंटवर‎ मनसे कार्यकर्त्यांनी बसवर‎ दगडफेक केल्यानंतर मनसेच्या‎ कार्यकर्त्यांवर आणि राज ठाकरे‎ यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.‎ पोलिसांनी चार्जशीट फाईल‎ केल्यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) परळीच्या‎ न्यायालयात तारखेला गैरहजर‎ राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध‎ अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.‎ या पूर्वी ३ जानेवारी आणि नंतर १२ जानेवारीला राज ठाकरेंना परळी‎ न्यायालयात हजर राहण्यास‎ सांगितले होते. अचानक काही कारणामुळे दौरा रद्द झाला होता. मात्र, उद्या सकाळी परळीत येणार असल्याने मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू केली आहे.

 

या प्रकरणी राज ठाकरे हे १२ जानेवारीलाच परळीत येणार होते. पण त्या दिवशी जिजाऊ जयंती असल्यामुळे,
न्यायालयाने त्यांना तारिख वाढवून दिली आहे. त्यानुसार त्यांना कोर्टाने १८ जानेवारीला हजर राहण्यास सांगितले.
त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे उद्या (दि. १८) परळी कोर्टात हजर राहणार आहेत.
त्यानंतर ते तेथील प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट देखील घेणार आहेत.

 

Web Title :- Raj Thackeray | raj thackeray will appear in parli court on january 18 what is the matter

 

हे देखील वाचा :

Nandurbar ACB Trap | दहावीचे मार्कशीट देण्यासाठी विद्यार्थ्याकडून लाच घेताना मुख्याध्यापक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Sanjay Raut | निवडणुक आयोगातील सुनावणी पुढे ढकलल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Maharashtra Politics | ‘आमच्याकडे बहुमत असल्याने लवकर निर्णय घ्या..,’ शिंदे गटाचा निवडणुक आयोगासमोर दावा

 

Related Posts