IMPIMP

Business Idea | 3000 रुपये लावून श्रीमंत बनण्याची संधी! ‘या’ बिझनेसमधून करू शकता लाखोंची कमाई

by sachinsitapure
Business Idea | phool jhadu broom making opportunity to become rich by investing 3000 rupees

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Business Idea | देशात असे अनेक लोक आहेत ज्यांना स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे, परंतु पैशांच्या कमतरतेमुळे ते बिझनेस सुरू करू शकत नाहीत. देशात जॉबचा इतका तुटवडा आहे की, लोकांना त्यांच्या शिक्षणानुसार जॉब मिळणे कठीण झाले आहे. अशा स्थितीत, आम्ही तुम्हाला अशा बिझनेसविषयी सांगत आहोत, जो स्मॉल स्केलवर सुरू करता येईल. ज्यामध्ये कमी इनव्हेस्टमेंटमध्ये जास्त कमाई करता येऊ शकते. चला त्याबद्दल जाणून घेऊया (Business Tips)…
Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

फुलझाडू

अनेक गोष्टी अशा असतात ज्यांचा वापर सर्वत्र केला जातो. यापैकी एक वस्तू म्हणजे फुलझाडू आहे. घर, कार्यालय, दुकान इत्यादी अनेक ठिकाणी लोक साफसफाईसाठी फुलझाडूचा वापर करतात. फुलझाडूला लोकांमध्ये मागणी असून त्याचा बिझनेस करून चांगला नफाही मिळवता येऊ शकतो. (Business Idea)

सुरू करू शकता बिझनेस

फुलझाडू बनवण्याचा बिझनेस केवळ ३ हजार रुपयांच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये सुरू करता येतो. फुलझाडू ३-४ महिने वापरला जातो, त्यानंतर तो खराब होतो. यामुळे लोकांमध्ये त्याची मागणी सतत असते आणि विक्रीही मोठ्या प्रमाणात होते.

या गोष्टी लक्षात ठेवा

फुलझाडू टायगर ग्रासपासून बनवला जातो. याशिवाय बायंडिंग वायर, हँडल आणि प्लास्टिक पाऊचची आवश्यकता असते. एक झाडू तयार करण्यासाठी ३०० ग्रॅम टायगर ग्रास घ्या, त्यात काही काड्या घाला आणि नंतर त्यास बायंडिंग वायरने चांगले बांधा. यानंतर काडीचा खालचा भाग कापून समान करा आणि त्यात एक हँडल टाका. हँडल खूप घट्ट लावू नका.

कमवू शकतात लाखो रूपये

भारतात फुलझाडू ५० ते १५० रुपयांना विकला जातो. अशा प्रकारे ३००० रुपये गुंतवून हा व्यवसाय सुरू करता येईल.
जर तुम्ही एका दिवसात १० फुलझाडू १०० रुपये प्रति दराने विकले तर दिवसाला १००० रुपये कमवू शकता आणि
वर्षातील ३६५ दिवस सहज ३.६५ लाख रुपये कमवू शकता. फुलझाडूच्या विक्रीवर नफ्याची गणना अवलंबून आहे.

(डिस्क्लेमर- इथे फक्त व्यवसाय सुरू करण्याची माहिती दिली आहे. कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुम्ही
संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तसेच नफ्याचे आकडे तुमच्या व्यवसायाच्या विक्रीवर अवलंबून असतील.

Related Posts