IMPIMP

10 वर्षे शिक्षक, ‘कोरोना’मुळे नोकरीत अडचण आली अन् सुरु केली स्ट्रॉबेरीची शेती; आता कमावताहेत लाखो रुपये

by sikandershaikh
strawberries

वाराणसी : बनारस येथे राहणाऱ्या रमेश मिश्रा हे एका खाजगी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. सर्वकाही सुरळीत सुरु होते. पण कोरोना व्हायरस आला आणि सर्व काही गोष्टी बदलू लागल्या. शाळेतील नोकरीमध्ये अडचणी येऊ लागल्या होत्या. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडली. पण त्यांच्यासमोर प्रश्न होता पुढे काय करायचं? मोठा विचार केल्यानंतर त्यांनी स्ट्रॉबेरची (strawberries) शेती करण्याचा निर्णय घेतला.

रमेश मिश्रा यांनी नोकरी सोडल्यानंतर त्यांच्या मित्राचे कामही बंद झाले होते. त्यावेळी रमेश आणि त्यांच्या मित्राने मिळून स्ट्रॉबेरीची (strawberries) शेती करायला सुरुवात केली. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. मात्र, त्यांनी केलेली शेती आता लाखो रुपयांचा फायदा देत आहे. सध्या फूड आणि कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये स्ट्रॉबेरीला मोठी मागणी आहे.

लॉकडाऊनच्या अडचणीतून काढला रस्ता

रमेश मिश्रा हे बनारसजवळील एका गावात राहतात. BHU तून ग्रॅज्युएट आहेत. त्यांना शिकवण्याचा दहा वर्षांचा अनुभव आहे. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर लोकांची नोकरी सातत्याने जात होती. तेही दुसरी नोकरी शोधत होते. इंटरनेटवर त्याबाबत सर्च सुरु केले. मात्र, काहीही सुचले नाही. काही लोकांनी स्ट्रॉबेरीच्या शेतीत मोठा फायदा आहे, असे सांगितले. तेव्हा मी ही शेती सुरु केली.

पुण्यातून मागवले रोपं

स्ट्रॉबेरीच्या शेतीतून मोठा नफा होतो. त्यासाठी किमान दोन एकर जमीन पाहिजे. रमेश यांनी पुण्यातून 15 हजार रोपं मागवले. त्यांना स्ट्रॉबेरीचे एक रोप 15 रुपयांना मिळाले. आम्ही ऑर्गेनिक पद्धतीने शेती सुरुवात केली. आता आम्ही मोठा नफा कमावतोय, असे त्यांनी सांगितले.

Related Posts