IMPIMP

Video : कोविडचे नियम मोडणार्‍या महिलेला दंड म्हणून पोलिसांने केला चक्क KISS

by sikandershaikh
covid 19

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)महिलेने कोविड (covid 19) काळातील नियमांचे उल्लंघन केले म्हणून पोलिसांनी तिला दंड आकारण्याऐवजी चक्क तिच चुंबन घेतल्याची घटना घडली आहे. पेरू या देशात ही घटना घडली आहे. या प्रकरणी त्या पोलिसाला निलंबित करण्यात आले आहे.

पेरू येथील एका टीव्ही चॅनलने या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल केले आहे. या व्हिडिओत दिसून येते की, कोरोनाच्या (covid 19) पार्श्वभूमीवर घातलेले निर्बंध एक महिला तोडते. त्यामुळे पोलीस तिला अडवतो. पोलिसाच्या हातात महिलेची माहिती घेण्यासाठी नोटपॅड देखील दिसत आहे. महिला त्याच्याशी बोलत असताना त्याच्या अत्यंत जवळ येते. पोलीस तिला दंड करणार असतो मात्र ती जवळ येताच तो स्वतःच्या तोंडावरील मास्क काढतो अन् तिचे चुंबन घेतो. ती महिला देखील त्याला प्रतिसाद देते. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संबधित पोलीसाला निलंबित करण्यात आले आहे.

Related Posts