IMPIMP

Winter Hair Care | हिवाळ्यात केसांची घ्या चांगली काळजी, डँड्रफपासून सुटका मिळवण्यासाठी ५ घरगुती उपाय

by nagesh
Winter Hair Care | winter hair care know how to take good care of hair in winter 5 home remedies to get rid of dandruff sscmp

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – Winter Hair Care | हिवाळ्यात अनेक लोक केसांच्या समस्यांनी त्रस्त असतात जसे की चिकटपणा, तेलकटपणा, गळणे, कोरडे केस. याशिवाय कोंड्यामुळे समस्या आणखी वाढतात. बुरशी, जळजळ, तेलकट स्काल्प आणि मलासेझिया हे डोक्यातील कोंड्यामुळे होते, परंतु हिवाळ्यात ही समस्या अधिकच वाढते कारण डोके कोरडे आणि इरिटेट होते. कोंड्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणत्या नैसर्गिक उपायांचा अवलंब करावा ते जाणून घेऊया. (Winter Hair Care)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

१. खोबरेल तेल आणि लिंबू
लिंबूमध्ये आढळणारे सायट्रिक अ‍ॅसिड स्काल्पला स्वच्छ करते आणि खोबरेल तेल त्याचे पोषण करते. हे दोन्ही घटक एकत्रितपणे कोंडा टाळण्यास आणि काढून टाकण्यास मदत करतात. यासाठी केवळ २ चमचे कोमट खोबरेल तेल आणि तेवढाच लिंबाचा रस मिक्स करा. नंतर टाळूवर हलक्या हाताने मसाज करा आणि शॅम्पू करण्यापूर्वी २० मिनिटे तसेच ठेवा.

 

२. बदाम तेल आणि टी ट्री ऑईल
टी ट्री ऑईलमध्ये अँटिफंगल आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात, जे कोंड्यावर सर्वोत्तम उपाय आहे. हे डेड स्किन आणि केमिकल दूर करण्यासदेखील मदत करते. दुसरीकडे बदामाचे तेल कोंडा निर्माण करणारी बुरशी आणि यीस्टचे संतुलन राखण्यास मदत करते. ५० मिली बदामाच्या तेलात टी ट्री ऑईलचे दोन थेंब मिसळा आणि टाळूवर हलक्या हाताने मसाज करा. ३० मिनिटांनंतर सामान्य शॅम्पूने धुवा. (Winter Hair Care)

३. कोरफड आणि कडुलिंब
दोन्हीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे आणि अँटिफंगल गुणधर्म आहेत आणि कोंडा दूर करण्यासाठी एक चांगला कॉम्बिनेशन बनवते. १०-१५ ताज्या कडुलिंबाच्या पानांसह २ चमचे कोरफड जेल वाटून घ्या. हे मिश्रण टाळूवर आणि केसांवरदेखील लावा आणि ३० मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर केस अँटी डँड्रफ शॅम्पूने धुवा.

 

४. अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरसह मेथी हेअर मास्क
मेथीमध्ये निकोटिनिक अ‍ॅसिड आणि प्रोटीन असतात जे डोक्यातील कोंडा प्रतिबंधित करते आणि टाळूचे पोषण करते.
त्यामुळे केसांच्या वाढीसाठीही ते चांगले आहे.
दुसरीकडे, अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर डोक्यातील कोंडा नियंत्रित करते आणि केस मजबूत करते.
२ चमचे मेथीदाणे रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी बारीक करा. आता त्यात अर्धा चमचा अ‍ॅप्पल व्हिनेगर मिसळा.
टाळू आणि केसांवर लावा आणि अर्धा तास सोडा. नंतर केस चांगल्या अँटी-डँड्रफ शॅम्पूने धुवा आणि नंतर कंडिशनर लावायला विसरू नका.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

५. केळी, लिंबू आणि मधाचा मास्क
हे तीन घटक कोंडा दूर करतात, केसांना मॉइश्चरायझ करतात आणि टाळू स्वच्छ करतात. केळी मॅश करा,
त्यात लिंबाच्या रासाचे काही थेंब आणि एक चमचा मध टाकून मास्क बनवा. आता हे मिश्रण टाळूवर लावा आणि ३० मिनिटांनी धुवा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Winter Hair Care | winter hair care know how to take good care of hair in winter 5 home remedies to get rid of dandruff sscmp

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | अधिवेशनात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी

Gram Panchayat Election | ग्रामपंचायत निवडणुकीत दीपक केसरकरांना ठाकरे गटाचा दणका

Sanjay Raut | देवेंद्र फडणवीस यांच्या ‘त्या’ दाव्यावर संजय राऊतांचा खोचक टोला, म्हणाले-‘नैरोबी-केनियाला देखील… ‘

 

Related Posts