IMPIMP

7th Pay Commission | जुलैमध्ये 38 टक्के होईल DA ! येथे जाणून घ्या पगारवाढी बाबत काय आहे अपडेट

by nagesh
Government Scheme | ppf crorepati scheme central government how to make 1 crore rupees fund public provident fund

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांना जुलै महिन्यात चांगली बातमी मिळू शकते. मीडिया रिपोर्टनुसार, AICPI Index मध्ये दोन महिन्यात लागोपाठ घट झाल्यानंतर मार्च 2022 मध्ये 1 पॉईंटची वाढ झाली आहे (7th Pay Commission). यावेळी अपेक्षा आहे की सरकार तीन नव्हे तर चार टक्के महागाई भत्ता (DA – Dearness allowance) वाढवू शकते. जर असे झाले तर कर्मचार्‍यांचा डीए 38 टक्के होईल. असे झाल्यास कर्मचार्‍यांच्या वेतनात 27,000 पेक्षा जास्त वाढ होऊ शकते ( 7th Pay Commission DA Hike latest news).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

जुलैमध्ये 38 टक्के होईल DA
7th Pay Commission अंतर्गत केंद्रीय कर्मचार्‍यांना दोन वेळा महागाई भत्ता दिला जातो. पहिला जानेवारी आणि दुसरा जुलै महिन्यात दिला जातो. सरकारने अलीकडेच 3 टक्के डीए वाढवला होता. जर महागाई भत्ता (DA) जुलैमध्ये रिवाईज झाला, तर यामध्ये पुन्हा 4 टक्के वाढ दिसून येऊ शकते.

या दरम्यान All India Consumer price index मध्ये महागाई वाढलेली दिसली तर सरकार जुलैमध्ये डीए वाढवू शकते. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये यात हलकी वाढ झाली होती. जानेवारीमध्ये डेटा कमी होऊन 125.1 झाला होता, तो फेब्रुवारीमध्ये 125 अंकावर आला होता आता मार्चमध्ये तो वाढून 126 वर पोहचला. जर आगामी महिन्यांमध्ये तो आणखी वाढला तर डीए वाढणे निश्चित आहे.

 

50 लाख कर्मचार्‍यांना होईल फायदा
सरकार वर्षात दोनवेळा डीए वाढवते. या वर्षाच्या सुरूवातीला सरकारने डीए एकदा वाढवला आहे. आता असे वृत्त आले आहे की, केंद्र पुन्हा एकदा डीएमध्ये 4 टक्के वाढ करू शकते. आता डीए 34 टक्के आहे. जर यामध्ये 4 टक्के आणखी वाढ झाली तर तो 38 टक्के होऊ शकतो. या निर्णयाने 50 लाखापेक्षा जास्त सरकारी कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना फायदा होईल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

38 टक्के झाल्यावर इतका वाढेल पगार
ज्या कर्मचार्‍यांची बेसिक सॅलरी 56,900 रूपये आहे, त्यांना 38 टक्के महागाई भत्ता झाल्यानंतर 21,622 रूपये डीए मिळेल.
आता 34 टक्के डीएच्या हिशेबाने 19,346 रुपये मिळत आहेत. 4 टक्के डीए वाढल्याने सॅलरीत 2276 रुपये वाढतील.
म्हणजे, वार्षिक सुमारे 27,312 रूपये वाढतील.

 

मागील DA वाढीवर एक नजर
जुलै 2021 मध्ये केंद्राने महागाई भत्ता आणि महागाई मदत 17 टक्केने वाढून 28 टक्के केला.
केंद्र सरकारने कोरोना व्हायरस महामारीमुळे जवळपास दीड वर्षापासून डीए रोखला होता.
ऑक्टोबर 2021 मध्ये 3 टक्के आणि वाढीसह केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी डीए वाढून 31 टक्के झाला.
आता तो 3 टक्के वाढवून 34 टक्के केला आहे.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission dearness allowance da new da will be 38 percent 27 thousand salary will increase salary update

 

हे देखील वाचा :

Shivsena MLA Ramesh Latke | शिवसेना आमदार रमेश लटके यांचे दुबईमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन

MLA Laxman Jagtap | आमदार लक्ष्मण जगताप यांची तब्येत ठणठणीत; हॉस्पिटलमधून हात हलवत चाहत्यांना दिला प्रतिसाद

Chhatrapati Sambhaji Raje | संभाजीराजे छत्रपती यांची मोठी घोषणा ! म्हणाले – ‘अपक्ष म्हणून राज्यसभा निवडणूक लढवणार’ (व्हिडीओ)

 

Related Posts