IMPIMP

Ajit Pawar | सरपंच, नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडता मग मुख्यमंत्रीही का निवडत नाही? अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना सुनावलं

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar reaction on shinde fadnavis governments on award announced of marathi translation of kobad gandhi original english book was cancelled

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) घेतलेले निर्णय बदलण्याचा सपाटा लावला आहे. तर काही निर्णय रद्द केले आहेत. यामध्ये नगराध्यक्ष (Mayor) तसेच सरपंच (Sarpanch) जनतेतून निवडण्याचा निर्णयाचा समावेश आहे. या निर्णयावरुन आज विधानसभेत अजित पवारांनी (Ajit Pawar) सरकारला अडचणीत पकडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही नगराध्यक्ष जनतेमधून नवडत असाल तर मग मुख्यमंत्र्यांची निवडही थेट जनतेमधूनच करा, असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले. पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon session) चौथ्या दिवशी ते विधानसभेत बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अशा प्रकराचे निर्णय हे लोकशाहीला घातक असल्याचे मत अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले. जर तुम्ही नगराध्यक्ष आणि सरपंच जनतेतून निवडणार असाल, तर मुख्यमंत्री (CM) सुद्धा का निवडत नाही? अशी विचारणा त्यांनी केली. ते पुढे म्हणाले, हा निर्णय फडणवीस सरकारकडून घेण्यात आला होता. मात्र, हा निर्णय यशस्वी झाला नाही. आम्हीही लोकांमधून निवडून येत आहोत असे सांगत त्यांनी या निर्णयाचे होणारे परिणाम सांगितले.

 

अजित पवार म्हणाले, ग्रामपंचायत निवडणूक पक्षीय पातळीवर होत नाहीत किंवा पक्षाच्या चिन्हावर होत नाहीत. मात्र इतर निवडणुका (Election) या पक्षाच्या चिन्हावर (Party Symbol) होतात. त्यामुळे, ज्यांच्याकडे पैसा आहे, मनी मसल आहे त्यांचीच दहशत राहील. त्यामुळे हा पायंडा लोकशाहीसाठी घातक आहे. त्यामुळे हे बिल रद्द करण्यात यावे.

 

यावेळी अजित पवारांनी लातूरचे उदाहरण दिले. जनार्दन पवार हे राष्ट्रवादीचे (NCP) नेते होते ते जनतेमधून निवडून आले.
परंतु त्याठिकाणी बहुमत काँग्रेसचं (Congress) होतं.
त्यामुळे बॉडी काँग्रेसची आणि नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा जनतेमधून निवडून आला होता. यामुळे विकासकामे करताना खूप अडचणी निर्माण झाल्या.

 

एकनाथ शिंदेंना टोला
शिंदे सरकारच्या या निर्णयावरुन अजित पवारांनी जोरदार हल्लाबोल केला.
मात्र एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना खोचक टोला देखील लगावला.
ते म्हणाले, मुख्यमंत्री म्हणून अशा पद्धितीने निवडून यायचं आणि नगराध्यक्ष थेट जनतेतून हे योग्य नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) होते. मात्र, तुम्ही आमदार (MLA) घेऊन गेला आणि मुख्यमंत्री झाला.
आमदारांना अधिकार नसते, तर तुम्ही मुख्यमंत्री झाला नसता, असा टोला त्यांनी लगावला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Ajit Pawar | NCP leader ajit pawar slams cm eknath shinde over direct election of nagaradhyaksha and sarpanch

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात अंधश्रद्धेचा कळस ! पत्नीला सर्वांसमोर अंघोळ करण्यास भाग पडले

Supreme Court | शिंदे-फडणवीस सरकारला ‘सुप्रीम’ दणका, BMC वॉर्ड फेरबदलाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिले ‘हे’ आदेश;

Vinayak Mete Accident | अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिल्या ‘या’ 2 महत्वपूर्ण सूचना, गृहमंत्र्यांनी दिलं आश्वासन

 

Related Posts