IMPIMP

भाजपाच्या चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून आज वाहतुकीत बदल

by bali123
Pimpri Traffic News | traffic changes on the occasion of kartiki yatra motorists please use an alternate route

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Bjp protest pune | भाजपाकडून शनिवारी कात्रज चौकात केल्या जाणाऱ्या चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी वाहतुकीत बदल केला आहे. स्वारगेटकडून कात्रजला जाणाऱ्या वाहनांना नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता) व गांगधाम (मार्केटयार्ड) मार्गे जावे लागणार आहे. वाहन चालकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

शनिवारी हे आंदोलन होणार असून भाजपचे नेते या आंदोलनाला उपस्थित असणार आहेत. कात्रज येथील वाहतूक सकाळी १० पासून आंदोलन संपेपर्यंत बंद असेल. स्वारगेटकडून कात्रजकडे येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद ठेवली केली जाणार आहे.

असा आहे बदल

मुंबईकडून कात्रजकडे येणारी वाहतूक नवले ब्रीजकडून सातारा रस्त्याने, कात्रज कोंढवा रस्त्याला जाणारी जड वाहने महामार्गावर एका बाजूला थांबवून ठेवली जाणार आहेत. तर, हलकी वाहने आणि दुचाकी कात्रज नऱ्हे रस्त्यावरील जिजामाता दत्तनगर भुयारी मार्गे येथून कात्रज डेअरीमार्गे इच्छितस्थळी जातील.

कोंढवा – कात्रजकडून मुंबईकडे जाणारी जड वाहने खडी मशीन चौक ते शत्रुंजय चौक या दरम्यान रस्त्याच्या कडेला थांबवून ठेवली जाणार आहेत. तर, हलकी वाहने राजस सोसायटी चौक, कात्रज नाका, दत्तनगरमार्गे मुंबईकडे जातील. कात्रज घाटातून शहरात येणारी जड वाहने बाजूला थांबवून हलकी वाहने कात्रज नाका येथून दत्तनगर चौक, भुमकर चौक मार्गे महामार्गावर जातील. नागरिकांनी या बदलाची नोंद घेऊन वाहतुकीचे नियोजन करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केली आहे.

Web Titel : bjp protest pune traffic police

Related Posts