IMPIMP

BJP Somuveer Raju | ‘भाजपला मत द्या, 70 रुपयात दारू देऊ’, भर सभेत आंध्रप्रदेशचे प्रदेशाध्यक्ष सोमवीर राजू यांचे आश्वासन

by nagesh
BJP Somuveer Raju | andhra pradesh somuveer raju vote for bjp will provide liquor for just rs 70

हैद्राबाद :वृत्तसंस्था BJP Somuveer Raju | आंध्र प्रदेशमध्ये सध्या निवडणुक जवळ आलेली नाही. परंतु निवडणुकीसंबंधी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वक्तव्य चर्चेचा विषय बनले आहे. येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष सोमवीर राजू (BJP Somuveer Raju) यांनी म्हटले की, भाजपाचे सरकार आल्यास लोकांना 75 रुपयात दारू पुरवली जाईल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

भाजपाने मंगळवारी विजयवाडा शहरात जन आग्रह सभा घेतली. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि पक्षाचे महासचिव सुनील देवधर
हेदखील सहभागी झाले होते.

कार्यक्रमात राजू यांनी म्हटले की, भाजपाला मत द्या, आम्ही तुम्हाला 75 रुपयात दारू देऊ. जर महसूल वाढला तर दारूची किंमत 50 रुपये केली
जाईल.

राजू (BJP Somuveer Raju) यांनी आरोप केला की, राज्यात खराब दर्जाची दारू विकली जाते आणि हे सत्ताधारी पक्षाच्या इशार्‍यावर होत आहे.

 

 

TMC खासदाराने केली टिका

भाजपा नेत्याच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी घेरण्यास सुरूवात केली आहे. टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांनी निशाणा साधताना म्हटले की,
अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांची खुपच चांगली निवडणूक रणनिती. आता पुढे कबाब बाबत सुद्धा बोलणार का?

अलिकडेच YSRCP सरकारने सुद्धा लोकांना आकर्षित करण्यासाठी दारूच्या किमती कमी केल्या होत्या. यामध्ये अतिरिक्त ड्यूटी कमी केली होती. यामुळे भारतात तयार झालेल्या परदेशी दारूची (आयएमएफएल) किंमत राज्यात 15-20 टक्केपर्यंत कमी झाली होती.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title: BJP Somuveer Raju | andhra pradesh somuveer raju vote for bjp will provide liquor for just rs 70

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील शाम सोनटक्के खून प्रकरणातील आरोपी सॅन्डी उर्फ संदीप चव्हाणला जामीन मंजूर

Beed Crime | भाजप जिल्हाध्यक्षाच्या शेतातील पत्त्याच्या क्लबवर पोलिसांची छापोमारी; 75 लाखांचा मुद्देमाल जप्त, राजेंद्र म्हस्केंसह 50 जणांविरुद्ध FIR

Narayan Rane | नारायण राणे यांना ‘या’ विधानावरुन पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस

 

Related Posts