IMPIMP

Chandrashekhar Bawankule | ‘आमचं कुळ हिंदुत्ववादी, तुम्ही तुमचे कुळ..’, उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेवर बावनकुळेंचा पलटवार (व्हिडिओ)

by nagesh
Chandrashekhar Bawankule | 'Our clan is Hindutva, you are your clan..', Uddhav Thackeray's 'that' criticism of Bavan clans' counterattack (Video)

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन– ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Thackeray Group Chief Uddhav Thackeray) यांची रविवारी मालेगावात जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर
टीकास्त्र सोडले. तुमचे 52 काय 152 कुळं खाली उतरले तरी ठाकरेंपासून शिवसेना (Shivsena) दूर करु शकत नाही. प्रयत्न करुन पहा, तातडीने
निवडणुका (Election) घ्या असे आव्हान करताना तुमच्या नावा इतक्या 52 तरी जागा मिंधे गटाला द्या असा टोला त्यांनी लगावला होता. ठाकरे यांच्या
टीकेला प्रत्युत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पलटवार केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

माझ्या कुळाचा उल्लेख करुन…

नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) बोलत होते. यावेळी त्यांना उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, माझ्या कुळाचा तीन वेळा त्यांनी उल्लेख केला. माझ्या कुळाचा उल्लेख करुन त्यांना आनंद मिळत असले. यावरून दिसते ते किती घाबरले आहेत. आज जे आहेत उरले, सुरलेले, त्यातील चारच लोक राहतील असा टोला त्यांनी लगावला.

 

 

 

ठाकरे कुळ तुम्ही डुबलं

बावनकुळे पुढे म्हणाले, आमचं कुळ हिंदुत्ववादी (Hindutva) आहे. तुम्ही आपलं कुळ डुबलं आहे. तुम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी ज्यापद्धतीने ठाकरे कुटुंबाला उंची दिली, त्या कुळाला उंची दिली, ते कुळ तुम्ही डुबलं आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. बावनकुळे आणि 152 कुळे कितीजरी चॅलेंज केले तरी शेवटी 13 कोटी जनता ठरवणार आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या इतिहासाचा जरा विचार करा, त्यांनी केलेल्या कामाचा विचार करा. तुम्ही तुमचं कुळ डुबवत आहात. तुम्ही ठाकरे घराण्याचे नाव उदध्वस्त करण्याचा प्रयत्न करताय अशी टीका बावनकुळे यांनी केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भाजप-सेना युती म्हणून लढणार

जागावाटपाबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, जागा वाटपाची कोणतीही चर्चा झालेली नाही. भाजप-शिवसेना युती (BJP-Shiv Sena Alliance) मिळून 288 जागा आम्ही लढवणार आहोत. लोकसभेतही भाजप-सेना युती म्हणून लढू. 48 लोकसभा आणि 200 हून अधिक विधानसभेच्या जागा आम्ही जिंकणार आहोत, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

 

 

सत्तेपासून पैसा आणि…

उद्धव ठाकरे यांनी भाजप भ्रष्ट माणसांचा पक्ष असल्याची टीका केली होती. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, भाजपचे सरकार देशात 9 वर्षांपासून आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पाच वर्षे मुख्यमंत्री होते. एकतरी भ्रष्टाचाराचा आरोप आहे का. भ्रष्टाचाराच्या बाजूला तुम्ही बसलेला आहात. सत्तेपासून पैसा आणि पैशांपासून सत्ता हे मिळवणारे तुम्ही आहात. राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसचा (Congress) धर्मच आहे, सत्तेपासून पैसा मिळवायचा. त्यांच्या माडीवर जाऊन तुम्ही बसले आहात. भ्रष्टाचाराची भाषा बोलणं तुम्हाला शोभत नाही, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

 

Web Title : Chandrashekhar Bawankule | ‘Our clan is Hindutva, you are your clan..’, Uddhav Thackeray’s ‘that’ criticism of Bavan clans’ counterattack (Video)

 

हे देखील वाचा :

S. Balan Cup T20 League | चौथी ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा; पुनित बालन ग्रुप संघाचा सलग दुसरा विजय; माणिकचंद ऑक्सिरीच संघाची विजयी सलामी !!

Uddhav Thackeray | सुप्रीम कोर्टाचा उद्धव ठाकरेंना दिलासा, ‘मशाल’ चिन्हा बाबतची समता पक्षाची याचिका फेटाळली

Joshi Sports Cup Premier League T20 Cricket | पहिली ‘जोशी स्पोर्ट्स करंडक’ प्रिमिअर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धा ! एलके इलेव्हन संघाचा दुसरा विजय; स्पार्टन्स् क्रिकेट क्लबने उघडले विजयाचे खाते

 

Related Posts