IMPIMP

Chandrashekhar Bawankule | ‘उद्धव ठाकरेंची बुद्धी भ्रष्ट झाली आहे’ – चंद्रशेखर बावनकुळे

by nagesh
Chandrasekhar Bawankule | chandrashekhar bawankule warning to anil deshmukh over bjp party joining offer

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   महाविकास आघाडीची स्थापना झाल्यापासून भाजप सतत शिवसेना आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करत आहे. आता पुन्हा एकदा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे अजूनही शरद पवारांच्या जाळ्यात अडकलेले आहेत, असे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

उद्धव ठाकरे अजूनही शरद पवारांच्या (Sharad Pawar) जाळ्यात अडकले आहेत. त्यामुळे उद्या त्यांनी त्यांना सांगितले, तर ते काँग्रेसच्या व्यासपीठावर देखील जाऊन बसतील. येवढी वर्षे भाजप आणि शिवसेना सोबत लढले आहेत. पण 2019 साली शरद पवारांच्या सांगण्यावरुन त्यांनी त्यांच्या आणि शिवसेनेच्या विचारांशी प्रातारणा केली आहे, असे बावनकुळे म्हणाले. ते सध्या कोल्हापुरात दौऱ्यावर (Kolhapur Tour) आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर भाष्य केले. (Chandrashekhar Bawankule)

 

यापूर्वी देखील त्यांनी शरद पवारांनी उद्धव ठाकरेंवर जादूटोणा केल्याचे म्हंटले होते. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची बुद्धी भ्रष्ट केली आहे. उद्धव ठाकरेंनी शरद पवारांचे एकूण हिंदुत्वाशी आणि शिवसेनेच्या विचारांशी प्रातारणा केली आहे. आणि ती त्यांनी सर्वात मोठी चूक केली आहे. राज्यातील काही पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. बाळासाहेबांचे विचार बाहेर पडले तरी त्यांना फरक पडत नाही. त्यांना फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पाहिजे, असे देखील यावेळी बावनकुळे म्हणाले.

 

बावनकुळे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले, माझ्या दौऱ्यावर मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होत आहेत.
एका बाजूला राहुल गांधी यांची यात्रा महाराष्ट्रात आणि कार्यकर्ते भाजपमध्ये अशी परिस्थिती काँग्रेसमध्ये आहे.
राहुल गांधी यांच्या यात्रेत काँग्रेस कार्यकर्ते कमी आणि नेते जास्त आहेत.
राहुल गांधींची यात्रा नेत्यांनी आणि त्यांच्या मुलांनी हायजॅक केली आहे.
राष्ट्रवादी पक्षाने देखील महाविकास आघाडी सरकार हायजॅक केले होते.
2024 पर्यंत भाजप आणि शिंदे गटात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार असून,
महाविकास आघाडीला निवडणुकीसाठी उमेदवार मिळणार नाही,
अशी महाविकास आघाडीची अवस्था होणार असल्याचे बावनकुळे म्हणाले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Chandrashekhar Bawankule | uddhav thackeray still stuck in sharad pawars trap says bjp maharashtra president chandrasekhar bawankule maharashtra politics news

 

हे देखील वाचा :

SSC, HSC Exam 2023 | दहावी आणि बारावीला बाहेरून फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंडळाचा मोठा दिलासा

Pune Crime | भरधाव दुचाकीच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या पोस्टमनचा मृत्यू

Jayant Patil On Jitendra Awhad | ‘जितेंद्र आव्हाड यांच्या भूमिकेशी राष्ट्रवादी काँग्रेस सहमत’ – प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

Uday Samant | ‘महाराष्ट्रातील उद्योजकांना विकास करण्यासाठी ताकदीचा मुख्यमंत्री मिळावा म्हणून आम्ही राजकीय पाऊल उचलले; कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही’

 

Related Posts