IMPIMP

CM Eknath Shinde | शिंदे गटात आपसात वाद! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाण्यातील बड्या नेत्यामध्ये खडाजंगी? राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

by nagesh
Eknath Shinde | Uddhav Thackeray's mistake has been corrected by Chief Minister Eknath Shinde - Jayakumar Gore

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – ठाण्यातील मोठे नेते आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Sarnaik) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक हे दोन्ही नेते ठाण्यातील प्रभावी नेते आहेत. प्रताप सरनाईक भविष्यात डोईजड होऊ नयेत, यासाठी त्यांचा ओवळा माजिवाडा मतदार संघ भाजपाला (BJP) देण्याची खेळी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून सुरू असल्याची चर्चा आहे. ओवळा माजिवाडा मतदारसंघ (Ovala Majiwada Constituency) शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला असून सरनाईक हे तब्बल तीन वेळा या मतदारसंघातून निवडूण आले आहेत. या मतदार संघावरून या दोन नेत्यांमध्ये वाद सुरू झाला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ईडीच्या (ED) कारवाईमुळे शांत असलेले सरनाईक हे शिंदे गटाच्या (Shinde Group) माध्यमातून भाजपाच्या आश्रयाला गेल्यानंतर त्यांची ईडीच्या कारवाईतून सुटका झाली आहे. आता सरनाईक पुन्हा सक्रिय झाले आहेत. दरम्यान, ओवळा माजिवाडा मतदार संघ भाजपाला सोडावा यासाठी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे प्रयत्न सुरू आहेत त्याला सरनाईकांनी विरोध केल्याची चर्चा आहे.

 

यामुळे शिंदे आणि सरनाईक यांच्यात बेबनाव असल्याचे दिसते. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये (Yashwantrao Chavan Centre) नगरविकास खात्याच्या एका कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री व्यासपीठावर असताना त्याठिकाणी सुरुवातीला प्रताप सरनाईक व्यासपीठावर गेले नाहीत. कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर सरनाईक यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करण्यात आली. यावरून सरनाईक हे नाराज असल्याचे दिसून आले होते.

 

कार्यक्रमानंतर पत्रकारांनी प्रताप सरनाईक आणि तुमच्यात खटके उडाल्याची चर्चा आहे,
असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना विचारला असता ते म्हणाले, आम्ही तुमच्यासमोर आहोत.
आम्ही काम करणारे लोक आहोत. आमचा फोकस राज्याला विकासाकडे नेण्याचा आहे.
एखादे काम सुरू होते वर्षानुवर्षे रेंगाळते.
त्यामुळे विकासासाठी आम्ही काम करत आहोत, असे भरकटवणारे वक्तव्य करत मुख्यमंत्र्यांनी मुळ मुद्द्यावर बोलणे टाळले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दरम्यान शिंदे-सरनाईक वादावर सर्वत्र चर्चा सुरू झाल्याने सरनाईक यांचे पुत्र माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक
(Purvesh Sarnaik) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचे एक छायाचित्र सोशल मीडियावर
पोस्ट केले असून त्यावर लिहिले आहे की, दो दिल और एक जान है हम !!

 

 

Web Title :- CM Eknath Shinde | verbal dispute between cm eknath shinde and shivsena mla pratap sarnaik

 

हे देखील वाचा :

Sourav Ganguly | बुमराहच्या दुखापतीवर BCCIचे अध्यक्ष सौरव गांगुलीनी हि महत्वाची अपडेट, म्हणाले की….

Gulabrao Patil | ज्या दिवशी धनुष्यबाण आपल्याकडे येईल…, गुलाबराव पाटलांचा शिवसेनेला गंभीर इशारा

 

Related Posts