IMPIMP

Devendra Fadnavis | ‘मी पुन्हा येईन’ व्हिडिओवर खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच दिले स्पष्टीकरण; ‘येणारी निवडणूक…‘

by sachinsitapure
Devendra Fadnavis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – भाजपाच्या (BJP) ‘एक्स’ अकाऊंटवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा ३१ सेकंदाचा ‘नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन’ अशा आशयाचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. मात्र, काही वेळातच तो डिलिट करण्यात आला. मात्र, त्यावर उलट-सुलट चर्चा होऊ लागल्याने भाजपा आणि मित्रपक्षांना यावर स्पष्टीकरण द्यावे लागत होते. आता खुद्द फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीच यावर स्पष्टीकरण दिले आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

फडणवीस म्हणाले, देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) पाठिशी आहे. एकनाथ शिंदेंच्या पाठिशी राहणार. एकनाथ शिंदे हे आमचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास घडवण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठिशी आहोत.

फडणवीस (Devendra Fadnavis) पुढे म्हणाले, जर एखाद्याला यायचे असेल तर व्हिडिओ टाकून येतो का? हा माझा
पहिला प्रश्न आहे. किती वेडेपणा, काहीतरी डोके ठिकाणावर असले पाहिजे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील. १ दिवसही कमी नाही.

ते मुख्यमंत्री असताना त्यांच्याच नेतृत्वात महाराष्ट्रात निवडणुका होतील. आम्ही सगळे एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी आहोत.
एखादा व्हिडिओ पडला त्याचे अर्थ काढणे चुकीचे आहे.

Related Posts