IMPIMP

Dombivli Crime | सोफा सेटमधील ‘त्या’ मृतदेहाचं गूढ उकललं, चौकशीत धक्कादायक कारण आलं समोर

by nagesh
Building slab collapses in Ulhasnagar 4 people died due to slab collapse in Ulhasnagar

डोंबिवली : सरकारसत्ता ऑनलाइनडोंबिवली शहरामध्ये (Dombivli Crime) काळजाचा थरकाप उडवणारी घटना उघडकीस आली होती. डोंबिवली (Dombivli Crime) पूर्व भागातील दावडी (Davadi) येथे एका महिलेचा निर्घृण खून (Murder) करुन त्या महिलेचा मृतदेह (Dead Body) तिच्याच घरातील सोफ्यात (Sofa) लपवून ठेवल्याचे आढळून आले होते. या महिलेच्या खुनाचे गुढ उकलण्यात मानपाडा पोलिसांना (Manpada Police Station) यश आले आहे. महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. महिलेने प्रतिकार केल्यामुळे तिचा गळा आवळून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून पोलिसांनी आरोपीला अटक (Arrest) केली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सुप्रिया किशोर शिंदे (Supriya Kishor Shinde) असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. डोंबिवली पूर्वेकडील (Dombivli Crime) दावडी येथील शिवशक्ती नगर (Shivshakti Nagar) परिसरात शिंदे कुटुंब वास्तव्यास आहे. सुप्रिया यांचा खून त्यांच्या घरा शेजारी राहणाऱ्या विशाल घावट याने केला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

 

सुप्रिया शिंदे यांचा मृतदेह घरातील सोफा सेटमध्ये आढळून आला होता. सुप्रियाचा गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला. मात्र कोणताच सुगावा नसल्याने आरोपीचा शोध घेणं पोलिसांसमोर आव्हान होतं. तपासादरम्यान साक्षीदारांनी सुप्रिया यांचा खून झाला त्यावेळी घराबाहेर चपला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी चप्पल कुणाची हे शोधून काढत आरोपीला बेड्या ठोकल्या. विशाल घावट याने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले तो सुप्रिया यांचा शेजारी आहे. पुस्तक देण्याच्या बहाण्याने तो घरात शिरला. सुप्रिया यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला मात्र, सुप्रियाने प्रतिकार केल्याने तिचा निर्घृण खून केला.

 

15 फेब्रुवारी रोजी पती किशोर हे कामावर गेले होते तर मुलगाही शाळेत गेल्याने सुप्रिया घरामध्ये एकट्याच होत्या. सुप्रिया मुलाला शाळेत आणण्यासाठी गेली नसल्याने फोन सुरु झाले. शेजाऱ्यांकडे ठेवण्यात आलेल्या चावीने दरवाजा उघडण्यात आला. मात्र, सुप्रिया आढळून आली नाही. दरम्यान तिचे पती किशोर हे संध्याकाळी उशीरा घरी पोहचले. पत्नीचा काही ठावठिकाणा लागत नसल्याने त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान काही शेजारी आणि नातेवाईक घरात आले. शेजाऱ्यांना सोफा विस्कटलेला दिसून आला आणि तो सोफा चाचपला. त्यावेळी त्यांना धक्का बसला. कारण सुप्रियाचा मृतदेह सोफ्यात कोंबून ठेवला होता. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बगाडे (Senior Police Inspector Shekhar Bagade), पोलीस निरीक्षक अनिल पडवळ (Police Inspector Anil Padwal) आणि पोलीस अधिकारी अविनाश वनवे (Police Officer Avinash Vanve) यांनी घटनास्थळी धाव घेतली. अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन पोलिसांनी तपास सुरु केला.

 

तपासादरम्यान काही साक्षीदारांनी घराच्या बाहेर चपला आढळल्याचे पोलिसांना सांगितले.
हाच धागा पकडून पोलिसांनी त्या चपला कुणाच्या याचा शोध घेतला.
विविध चपलांचे फोटो साक्षीदारांना दाखवत चप्पल कोणाची हे निष्पन्न झाले.
अखेर शिंदे यांच्या शेजारच्या इमारतीत राहणाऱ्या विशाल घावट याची चप्पल असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

 

सुप्रिया यांना वाचनाची आवड असल्याने विशाल पुस्तक देण्याच्या बहाण्याने तिच्या घरी गेला.
सुप्रिया घरी एकटीच असल्याचा फायदा घेत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.
सुप्रियाने त्याला प्रतिकार केला. यावेळी विशालने सुप्रियाचे डोके फरशीवर आपटलं.
त्यानंतर टायने गळा आवळून तिला ठार मारले व तिचा मृतदेह घरातील सोफासेटमध्ये लपून ठेवला.
पोलिसांनी केवळ चप्पल वरुन आरोपीचा शोध घेऊन आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Dombivli Crime | dombivli murder sofa set dead body case married woman killed by neighbor

 

हे देखील वाचा :

Pune Crime | सराईत वाहनचोराला गुन्हे शाखेकडून अटक, दोन दुचाकी जप्त

Pune Crime | दुचाकी आणि अ‍ॅल्युमिनीयमच्या पट्ट्या चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खडक पोलिसांकडून अटक; 2 लाखाचा मुद्दमाल जप्त

SBI Recurring Deposit | एसबीआयच्या कोट्यावधी खातेधारकांसाठी खुशखबर ! देशातील सर्वात मोठ्या बँकेने दिली ‘ही’ भेट

SaReGaMaPa Winner Vaishali Bhaisane Made | ‘माझ्या हत्येचा कट रचला जातोय’; राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या गायिकेच्या Facebook पोस्टने प्रचंड खळबळ

 

Related Posts