IMPIMP

Eknath Khadse | एक नोटीस आली काय अन् जळफळाट सुरु, तुम्ही नाथाभाऊंची पिळवणूक केली नाही का?, एकनाथ खडसेंचा फडणवीसांना सवाल

by nagesh
Devendra Fadnavis | BJP leader devendra fadnavis on eknath khadse meeting amit shah joing bjp

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइनदेवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक नोटीस आली आणि त्यांचा जळफळाट सुरु झाला. देवेंद्रजी म्हणतात मी भ्रष्टाचार (Corruption) बाहेर काढला म्हणून माझी पिळवणूक सुरु झाली. भाजपमध्ये (BJP) असताना तुम्ही नाथाभाऊंची (Nathabhau) पिळवणूक केली नाही का ? असा सवाल करत राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील (Muktainagar Taluka) पुरनाड येथे आयोजित कार्यक्रमात एकनाथ खडसे (Eknath Khadse) बोलत होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सायबर पोलिसांनी (Mumbai Cyber police) चौकशीसाठी समन्स (Summons for Interrogation) पाठवल्याने त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) निशाणा साधला होता. यावरुन एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे.

 

एकनाथ खडसे म्हणाले, मी मुख्यमंत्रिपदाचा (CM) दावेदार होतो हे तुम्हाला माहीत होतच तुम्ही माझी पिळवणूक सुरु केली.
माझ्यामागे जमीन भूखंड प्रकरण (Land Case), अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Underworld don Dawood Ibrahim) याच्या बायकोसोबत संबंध जोडले, अंजली दमानिया (Anjali Damania) यांना माझ्या मागं लावलं,
हे उद्योग कोणी केले ? अशा शब्दात त्यांनी फडणवीसांना फटकारले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

माझे फोन टॅप झाले
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना माझे फोन टॅप (Phone Tap) झाले, असा गंभीर आरोप खडसे यांनी केला आहे.
फोन कोणाचे टॅप होतात ज्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत.
माझे काय देशद्रोह्यांसोबत संबंध आहेत का ? मग माझा फोन टॅप करण्याचं कारण काय ? असा सवाल करत त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.

 

Web Title :- Eknath Khadse | ncp leader eknath khadse slams bjp leader and leader of opposition in the assembly devendra fadnavis

 

हे देखील वाचा :

Pune Corporation | प्रशासक म्हणून महापालिका आयुक्तांचा पहिलाच दणका ! वाहतूक गतिमान करण्यासाठी पदपथ, रस्ते आणि इमारतींच्या साईड मार्जीनमधील बेकायदा व्यवसायांवर कारवाई करणार

Pune Crime | अंगठी खरेदीच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या आंबेगाव पठार परिसरातील 20 आणि 21 वर्षीय मुलींना सहकारनगर पोलिसांकडून अटक

Madras High court | ऑफिसमध्ये खासगी कामासाठी मोबाईल वापरल्यास जाऊ शकते नोकरी, हायकोर्टाने दिला ‘हा’ महत्वाचा निर्णय

 

Related Posts