IMPIMP

EPFO ला विश्वास, शेयर मार्केटमध्ये येणार्‍या इन्व्हेस्टर्ससाठी ’अच्छे दिन’

by nagesh
EPFO Alert | epfo warning for pf account holders about fake calls and messages

नवी दिल्ली : वृत्तसंस्था EPFO | गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजारातील (Share Market) घसरणीमुळे गुंतवणूकदारांना (Investors Of Stock Market) कमाईच्या चांगल्या संधी निर्माण झाल्या आहेत. अनेक विश्लेषक याला ’Buy The Dip’ मुव्हमेंट म्हणत आहेत. रिटायरमेंट फंड बॉडी ईपीएफओ (EPFO) देखील या संधीचा फायदा घेण्याच्या तयारीत आहे. असे म्हटले जात आहे की ईपीएफओ या महिन्यात इक्विटीमधील इन्व्हेस्टमेंट लिमिट (EPFO Equities Investment Limit) सध्याच्या 15 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर करू शकते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

वाढवून इतके होऊ शकते लिमिट
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, Employees Provident Fund Organisation इक्विटीमधील गुंतवणुकीची मर्यादा वाढविण्याचा विचार करत आहे. यासंदर्भात संस्थेकडे यापूर्वीच प्रस्ताव आला आहे. इक्विटीमध्ये गुंतवणुकीची मर्यादा 20 टक्के करण्यात यावी, जी सध्या 15 टक्के आहे, असे या प्रस्तावात म्हटले आहे. रिपोर्टनुसार, ईपीएफओ या महिन्यात या प्रस्तावाला मंजुरी देऊ शकते. ईपीएफओच्या विश्वस्तांची पुढील बैठक 29 आणि 30 जुलै रोजी होणार आहे. पुढील बैठकीतच या प्रस्तावाला मंजुरी मिळू शकते, असे सूत्रांच्या हवाल्याने रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

 

आता इतके पैसे गुंतवण्याची मर्यादा
सध्या, ईपीएफओ त्यांच्या गुंतवणूक करण्यायोग्य ठेवींपैकी 5 टक्के ते 15 टक्के रक्कम इक्विटी किंवा इक्विटी संबंधित योजनांमध्ये गुंतवू शकते. ही मर्यादा 20 टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला ईपीएफओची अ‍ॅडव्हायजरी बॉडी फायनान्स ऑडिट आणि इन्व्हेस्टमेंट कमिटी (Finance Audit and Investment Committee) ने आधीच मंजुरी दिली आहे.

 

वृत्तानुसार, फायनान्स ऑडिट अँड इन्व्हेस्टमेंट कमिटी (FAIC) ची सूचना आता सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी (Central Board of Trustees) समोर ठेवली जाईल. या प्रस्तावावर विचार केल्यानंतर केंद्रीय मंडळ त्यास मान्यता देऊ शकते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

EPFO च्या या कमिटीने दिली आहे मान्यता
वृत्तात म्हटले आहे की, केंद्रीय कामगार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (CBT) या महिन्याच्या अखेरीस होणार्‍या बैठकीत फायनान्स ऑडिट अँड इन्व्हेस्टमेंट कमिटीची सूचना स्वीकारू शकते.

 

जर मंजूर मिळाली, तर इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ईपीएफओची मर्यादा सध्याच्या 5-15 टक्क्यांवरून 5-20 टक्क्यांपर्यंत वाढेल.
श्रम आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली (Rameshwar Teli) यांनी सोमवारी लोकसभेत सांगितले
की, फायनान्स ऑडिट अँड इन्व्हेस्टमेंट कमिटीने इक्विटीमधील गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

 

ईपीएफओला शेअर बाजारातून इतकी कमाई
ईपीएफओने ऑगस्ट 2015 मध्ये इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर ईपीएफओने गुंतवणूक करण्यायोग्य ठेवीपैकी 5 टक्के रक्कम इक्विटीमध्ये गुंतवली होती. ही मर्यादा नंतर 15 टक्के करण्यात आली.

 

दुसरीकडे, शेअर बाजारात पैसे गुंतवण्याची मर्यादा वाढवण्यास कामगार संघटना विरोध करत आहेत.
शेअर बाजारातील गुंतवणुकीवर सरकारी हमी नसल्याचे कामगार संघटनांचे (Trade Unions) म्हणणे आहे.

मात्र, अलीकडे शेअर बाजारातून ईपीएफओला मिळणारा रिटर्न वाढला आहे. श्रम आणि रोजगार राज्यमंत्र्यांनी संसदेत सांगितले होते
की 2020-21 मध्ये इक्विटी गुंतवणुकीवरील रिटर्न 14.67 टक्के होता, जो 2021-22 मध्ये 16.27 टक्के झाला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- EPFO | investment in equities employees provident fund organisation limit distribution epfo news

 

हे देखील वाचा :

Ramdas Kadam | ‘शरद पवारांनी डाव साधला, पक्ष फोडला’ ! शिवसेना पत्त्यासारखी कोसळतेय, झोप लागत नाही, जेवण जात नाही’ – रामदास कदम

Shivsena MP Sanjay Raut | ‘आमदार, खासदार गेले तरी बाळासाहेबांची शिवसेना संपणार नाही’ – संजय राऊत

Anti Corruption Bureau (ACB) Sangli | 25 हजाराची लाच प्रकरणी 2 पोलीस एसीबीच्या जाळ्यात; सांगली पोलिस दलात खळबळ

 

Related Posts