IMPIMP

EPFO Update | UAN मेंबर पोर्टलवर प्रोफाईल पिक्चर अशाप्रकारे करू शकतात अपलोड, याशिवाय होणार नाही ई-नॉमिनेशन

by nagesh
EPFO Udate | upload profile picture on uan member portal without which e nomination is not possible

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – EPFO Update | सर्व ईपीएफओ धारकांना ई-नामांकन दाखल करणे अनिवार्य आहे. ऑनलाइन ईपीएफओ मेंबर आयडीवर प्रोफाइल फोटो नसल्यास ई-नामांकन शक्य होणार नाही. ई-नामांकन दाखल करण्यासाठी तुम्ही यूएएन खात्यात लॉग इन केल्यास ईपीएफओ सदस्याच्या (EPFO Update) आयडीमध्ये प्रोफाइल फोटो नसेल तर तुम्हाला ‘unable to proceed‘ असा मेसेज येईल. त्यामुळे तुम्हाला सल्ला दिला जातो की तुम्ही प्रथम तुमच्या यूएएन सदस्य पोर्टलवर तुमचा प्रोफाइल फोटो अपलोड करा. यानंतर ईपीएफओ ई-नामांकन (e-Nomination) पूर्ण करा.

ई-नॉमिनेशनमध्ये फोटो कसा अपलोड करावा

तुमच्या यूएएन सदस्य आयडीने ईपीएफओच्या अधिकृत पोर्टलवर लॉग इन करा

– मेनू विभागात ड्रॉप डाउन करा आणि व्ह्यू वर क्लिक करा

– आता प्रोफाइल निवडा

– यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला तुमच्या प्रोफाइलबद्दल तपशील आणि प्रोफाइल फोटो बदलण्याचा पर्याय दिसेल

– ईपीएफओने विहित केलेल्या फॉरमॅटमधील फोटो निवडा

– तुमचा फोटो अपलोड करा आणि ओके निवडा (EPFO Update)

या गोष्टी लक्षात ठेवा

– तुमचा प्रोफाईल फोटो अपलोड करण्यापूर्वी, त्याचा आकार, स्वरूप आणि इतर तपशीलांची माहिती मिळवा. ईपीएफओच्या मते, तुमच्या प्रोफाइल फोटोसाठी या गोष्टी आवश्यक आहेत.

– छायाचित्र डिजिटल कॅमेर्‍याने काढावे.

– अपलोड करण्यापूर्वी छायाचित्र 3.5 सेमी, 4.5 सेमी आकारापर्यंत मर्यादित असावे.

– फोटोमध्ये चेहरा ठळकपणे दिसला पाहिजे (इमेजच्या 80%) आणि दोन्ही कान दिसले पाहिजेत.

– इमेज जेपीईजी किंवा जेपीजी किंवा पीएनजी फॉरमॅटमध्ये असावी.

Web Title :- EPFO Udate | upload profile picture on uan member portal without which e nomination is not possible

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

EPFO | एक मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या तुमच्या पीएफ खात्यात (PF Account) किती आहे शिल्लक, ईपीएफओने सांगितली पद्धत

Pune Crime | मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ दाखवून 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; नराधमास 20 वर्षे सक्तमजुरी

Pune Municipal Corporation Election 2022 | प्रभाग 28 आणि 40 मधील अनुसूचित जातीचे आरक्षण उडाले; प्रभाग क्र. 42 आणि 47 मध्ये पडले

Related Posts