IMPIMP

Gold Price Today | सोने खरेदीदारांना लागली लॉटरी, 10 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत झाले स्वस्त, जाणून घ्या नवीन दर

by nagesh
Gold Price Today | gold silver jewelry rate price latest update 27th september know latest rate indian sarafa market today

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Gold Price Today | जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोशिएशन (IBJA) च्या बेवसाइटनुसार सोन्याच्या किमतीत 4 रुपये प्रति 10 ग्रॅमसह किरकोळ तेजी दिसून येत आहे. या तेजीसह सोने 46278 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर खुले झाले. तर चांदी 177 रुपये प्रति किलोच्या घसरणीसह खुली झाली. या घसरणीसह आज चांदीचा दर 60233 रुपये प्रति किलोवर (Gold Price Today) खुला झाला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्यासह चांदीच्या किमतीत तेजी दिसत आहे. एमसीएक्सवर सोने 93 रुपयांच्या तेजीसह 46088 रुपयांच्या
स्तरावर ट्रेड करत आहे. तर चांदी 501 रुपयांच्या तेजीसह 60456 रुपयांच्या स्तरावर ट्रेड करत आहे. मागील व्यवहाराच्या आठवड्याच्या शेवटच्या
दिवशी शुक्रवारी सोने 46274 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर बंद झाले होते. तर चांदी 60410 प्रति किलोच्या दरावर बंद झाली होती.

सोने 9922 आणि चांदी 19747 रुपये स्वस्त
अशाप्रकारे सोने आज सुद्धा आपल्या सर्वोच्च स्तरापासून सुमारे 9922 रुपये प्रति 10 ग्राम स्वस्त विकले जात आहे. सोन्याने आपला सर्वोच्च स्तर ऑगस्ट 2020 मध्ये गाठला होता. त्यावेळी सोने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर गेले होते. मागील दिवसात स्थानिक बाजारात सोने घसरून 45 हजार रुपयांच्या खाली (Gold Price Today) गेले होते.

तर यावर्षी 1 जानेवारीला सोने 50,300 रुपयांवर होते. तर चांदी आपल्या सर्वोच्च स्तरापासून सुमारे 19747 रुपये प्रति किलोच्या दराने स्वस्त मिळत आहे. चांदीचा आतापर्यंतचा सर्वाच्च स्तर 79980 रुपये प्रति किलो आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

देशातील प्रमुख शहरात सोन्याचा नवीन दर

दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर 46990 रुपये आहे, तर 22 कॅरेटचा दर 43138 रुपये आहे.

मुंबईत 24 कॅरेट 47070 रुपये आहे, तर 22 कॅरेटची किंमत 43148 रुपये आहे.

कोलकातामध्ये 24 कॅरेट 47010 आहे. तर 22 कॅरेट 43093 रुपयांनी विकले जात आहे.

चेन्नईत 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 47210 आणि 22 कॅरेटचा दर 43276 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

 

 

अंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी तेजीत
अंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यात तेजीसह व्यवहार होत आहे. अमेरिकेत सोन्याचा व्यवहार 7.53 डॉलरच्या तेजीहस 1757.03 डॉलर प्रति औंसच्या रेटवर ट्रेड होत आहे. तर चांदीचा व्यवहार 0.18 डॉलरच्या तेजीसह 22.60 डॉलर प्रति औंसच्या स्तरावर ट्रेड होत आहे.

 

 

Web Title :- Gold Price Today | gold silver jewelry rate price latest update 27th september know latest rate indian sarafa market today

 

हे देखील वाचा :

Lonand Railway Accident | दुर्देवी ! रेल्वेच्या धडकेत बाप-लेकाचा मृत्यू

Ajit Pawar | ‘…अन् मुख्यमंत्र्यांच्या पुढं आमचं काही चालत नाही’

Hinjewadi-Shivajinagar Metro | प्रतीक्षेत असलेल्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला मिळाला ‘मुहूर्त’

Pune Police | गुन्हे शाखेचा शहरात रिक्षाचालकांविरोधात ‘ड्राईव्ह’, अनेक रिक्षाचालकांवर कारवाई

 

Related Posts