IMPIMP

Gyanvapi Mosque Case | ज्ञानवापी प्रकरणी हिंदू पक्षाच्या बाजूने निकाल, पुढील सुनावणी 22 सप्टेंबरला

by nagesh
Gyanvapi Mosque Case | judge ak vishvesh delivering verdict gyanvapi shrinagar gauri dispute case holds case maintainable Gyanvapi Mosque Case verdict

वाराणसी : वृत्तसंस्था – Gyanvapi Mosque Case | वाराणसीतील ज्ञानवापी-शृंगार गौरी प्रकरणाचा (Gyanvapi Mosque Case) निकाल देताना या
प्रकरणातील हिंदू पक्षकरांची याचिका कोर्टात स्वीकारण्यात आली. ज्ञानवापी खटल्याचा निकाल देताना जिल्हा न्यायाधीश ए. के. विश्वेश (District
Judge A.K. Vishwesh) यांच्या एक सदस्यीय खंडपीठाने (Bench) हा खटला कायम ठेवण्यायोग्य असल्याचे मानले. यावेळी मुस्लीम (Muslim)
बाजूची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आणि खटल्याची पुढील सुनावणी 22 सप्टेंबर रोजी होणार असल्याचे स्पष्ट केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी प्रकरणावर (Gyanvapi Mosque Case) जिल्हा न्यायालयाने निकाल दिला. ज्ञानवापी शृंगार गौरी प्रकरणी (Gyanvapi Sringar Gauri case) निकाल देताना कोर्टानं म्हटलं की, या वादावर सुनावणी केली जाईल. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 तारखेला होणार आहे. न्यायालयाने सांगितले की, राखी सिंह (Rakhi Singh) विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य (Uttar Pradesh State) केस न्यायालयात चालविण्यास योग्य आहे. असा निर्णय देताना प्रतिवादी अंजुमन इनजतिया मशीद कमीटीचा (Anjuman Injatia Masjid Committee) अर्ज कोर्टानं फेटाळला आहे.

 

 

जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश (District Judge Ajay Krishna Vishvesh) यांनी हा निकाल दिला. यावेळी हिंदू पक्षाचे वकील हरिशंकर जैन (Harishankar Jain) आणि विष्णू जैन (Vishnu Jain) यावेळी उपस्थित होते. याशिवाय लक्ष्मी देवी (Lakshmi Devi), रेखा आर्या (Rekha Arya) आणि मंजू व्यास (Manju Vyas) या 5 पैकी 3 फिर्यादी देखील कोर्टात पोहोचल्या होत्या. केवळ 40 पक्षकार आणि त्यांच्या वकिलांना या सुनावणीवेळी प्रवेश मिळाला होता. इतर लोकांना कोर्टामध्ये प्रवेश देण्यात आला नव्हता.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

हिंदू पक्षाचा दावा

16 व्या शतकात मुघल शासक औरंगजेबाने मंदिर तोडून मशीद बांधली होती. तर मुस्लीम बाजूचे म्हणणे आहे की तेथे आधीपासूनच मशीद होती, मंदिर पाडले गेलेले नाही. त्यानंतर 7.11 नियमान्वये झालेल्या चर्चेत दोन्ही बाजूंनी अनेक दावे मांडले. या प्रकरणात पूजा कायदा लागू होत नाही, असे हिंदू बाजूचे म्हणणे आहे. तर मुस्लीम पक्षाचे म्हणणे आहे की मशिदीला उपासना कायद्यांतर्गत संरक्षण असावे.

 

 

आमच्या बाजूने निकाल लागला नाही तर…- मुस्लीम पक्षकार

ज्ञानवापी वरील निकालाबाबत मुस्लीम पक्षाचे वकील मोहम्मद तौहीद (Lawyer Mohammad Tawheed) म्हणाले की,
निर्णय त्यांच्या बाजून आला नाही तर उच्च न्यायालयाचे (High Court) दरवाजे त्यांच्यासाठी खुले आहेत.
आणि जर न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजूने आला नाही तर आम्ही उच्च न्यायालयात जाऊ.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Gyanvapi Mosque Case | judge ak vishvesh delivering verdict gyanvapi shrinagar gauri dispute case holds case maintainable Gyanvapi Mosque Case verdict

 

हे देखील वाचा :

Pune Water Supply | पुण्यातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार

Lemon In Diabetes | डायबिटीज वाढल्याने त्रस्त आहात का? मग आजच या पद्धतीने लिंबू खायला करा सुरूवात, होईल जबरदस्त फायदा

Torrent Pharmaceuticals Ltd | बोनस शेयर मिळाल्याने गुंतवणुकदारांचे 1 लाख 1000 पट वाढून 17 कोटी झाले, तुमच्याकडे आहेत का हे शेअर?

 

Related Posts