IMPIMP

Hingoli ACB Trap | शेतजमीन मोजण्यासाठी 50 हजार रुपये लाच स्वीकारताना भूमापक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

by nagesh
ACB Trap News | Anti-corruption Bureau Nanded: Women sarpanch and gram sevak caught in anti-corruption net while fleeing after taking bribe

हिंगोली :सरकारसत्ता ऑनलाईन – शेत जमीन मोजमापासाठी 50 हजारांची लाच स्वीकारताना (Accepting Bribe) भूमापकासह (Land Surveyor) एकाला हिंगोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Hingoli ACB Trap) रंगेहात पकडले. मारोती प्रकाश घाटोळे Maroti Prakash Ghatole (वय 33), खासगी व्यक्ती चांदू ईश्वरा भाद्देवाड Chandu Ishwara Bhaddewad (वय 32 रा. टाकळगाव ता. वसमत जि. हिंगोली) असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. हिंगोली एसीबीच्या पथकाने (Hingoli ACB Trap) ही कारवाई सोमवारी (दि.30) दुपारी अडीचच्या सुमारास केली.

 

याबाबत 36 वर्षाच्या व्यक्तीने 23 जानेवारी रोजी हिंगोली एसीबीकडे (Hingoli ACB Trap) तक्रार केली आहे. वसमत शहरातील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील (Deputy Superintendent Land Records Office) भूमापक मारोती घाटोळे यांनी शेत जमीन मोजपमापनासाठी तक्रारदार यांच्याकडे 80 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती 50 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी हिंगोली एसीबीकडे तक्रार केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

हिंगोली एसीबीच्या पथकाने 23, 25 आणि 27 जानेवारी रोजी पडताळणी केली असता तक्रारदार यांच्या शेत जमीनीची मोजणी करण्यासाठी मारोती घाटोळे यांनी 80 हजार रुपये लाचेची मागणी (Demanded Bribe) करुन तडजोडी अंती 50 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. सोमवारी दुपारी बसस्थानक परिसरात भाजी विक्रीचा व्यवसाय करणारा चंदू भाद्देवाड याचेकडे लाचेची रक्कम देण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदाराकडून 50 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना खाजगी व्यक्ती भाद्देवाड आणि भूमापक मारोती घाटोळे याला ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक परिक्षेत्राचे (Nanded ACB) पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे (SP Dr. Rajkumar Shinde),
अपर पोलीस अधिक्षक धरमसिंग चव्हाण (Addl SP Dharamsingh Chavan)
यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली एसीबी पोलीस उप अधीक्षक निलेश सुरडकर (Deputy Superintendent Nilesh Suradkar),
पोलीस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर (Police Inspector Prafulla Ankushkar),
पोलीस निरीक्षक विजय पवार (Police Inspector Vijay Pawar) पोलीस अंमलदार विजय उपरे, पंचलिंगे, मुंडे, अकबर, फुफाटे, वाघ यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Hingoli ACB Trap | Surveyor caught in anti-corruption trap while accepting Rs 50,000 bribe to measure agricultural land

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून निवडणुक आयोगाकडे लेखी युक्तीवाद सादर; खासदार अनिल देसाईंनी दिली माहिती

Maharashtra Politics | वरळीत आदित्य ठाकरेंना मोठा धक्का, माजी नगरसेवकाचा शिंदे गटात प्रवेश

Chitra Wagh | ‘मी कोणाचीच तुलना केली नाही’, ‘त्या’ वक्तव्यावरुन चित्रा वाघ यांची सारवासारव (व्हिडिओ)

 

Related Posts