IMPIMP

Income Tax Raid | मंत्री अनिल परब यांच्या CA च्या घरावर आयकर विभागाचा छापा

by nagesh
Income Tax Raid | income tax raid on anil parbas ca house in mumbai MIG Bandra

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनमहाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब (Transport Minister and Shiv Sena Leader Anil Parab) यांच्या ‘सीए’च्या (Chartered Accountant) कार्यालयावर आयकर विभागाने धाड (Income Tax Raid) टाकली आहे. मुंबई वांद्रे एमआयजी (MIG Bandra) परिसरातील एलिट इमारतीत (Elite Building) ही कारवाई सुरु आहे. एकीकडे शिवसेना खासदार (Shivsena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांची पत्रकार परिषद सुरु असताना दुसरीकडे अनिल परब यांच्या सीएच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

घटनास्थळी आयकर विभागाचे पथक उपस्थित असून सीआयएसएफच्या (CISF) जवानांना परिसरात तैनात करण्यात आले आहे. एआयजी क्लबच्या बाजुलाच अनिल परब यांचे वास्तव्य आहे. त्यांच्या शेजारीच त्यांचे सीए (CA) राहतात. आयकर विभागाचे पथक अनिल परब यांच्याही कार्यालयावर छापा टाकू शकते, असे सांगण्यात येत आहे.

 

एवढच नाही तर, अनिल परब यांचे निकटवर्तीय समजले जाणारे संजय कदम (Sanjay Kadam) यांच्याही घरी आयकर विभागाचे पथक (Income Tax Raid) धडकले आहे.
संजय कदम हे शिवसेनेचे अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे (Andheri West Constituency) संघटक आहेत.
त्यांच्याही घरी आयकर विभागाचे अधिकाऱ्यांनी छापेमारी सुरु केली आहे.

 

Web Title :- Income Tax Raid | income tax raid on anil parbas ca house in mumbai MIG Bandra

 

हे देखील वाचा :

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवड शहरात आज शून्य रुग्णांच्या मृत्यूची नोंद; जाणून घ्या ‘कोरोना’ची इतर आकडेवारी

Sanjay Raut | ED ‘ही’ भाजपची ATM मशीन झालीय, संजय राऊतांची टीका (व्हिडिओ)

Pune Corona Update | गेल्या 24 तासात पुण्यात कोरोनातून बर्‍या होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन रुग्णांची संख्या जास्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts