IMPIMP

Aurangabad Crime | पत्नीच्या गर्भपातासाठी पतीचे धक्कादायक कृत्य; फुलंब्री मधील प्रकार

by nagesh
Aurangabad Crime | woman dies due to overdose of abortion pills in aurangabad

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाईन- Aurangabad Crime | जिल्ह्यातीत फुलंब्री तालुक्यातील रेलगाव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे.
पत्नीचा गर्भपात करण्यासाठी पतीने पत्नीला गर्भपाताच्या आवश्यक्तेपेक्षा जास्त गोळ्या दिल्याने पत्नीचा रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला आहे. गरजेपेक्षा
जास्त गोळ्या दिल्याने हा मृत्यू झाला आहे. वैशाली बाळासाहेब क्षीरसागर असे मृत महिलेचे नाव आहे. तर बाळासाहेब गणपत क्षीरसागर असे आरोपी
पतीचे नाव आहे. फुलंब्री पोलीस ठाण्यात बाळासाहेब क्षीरसागर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Aurangabad Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब क्षीरसागर यांची पत्नी वैशाली क्षीरसागर या गर्भवती होत्या. मात्र आणखी आपत्ये नको असल्याने बाळासाहेब क्षीरसागर यांने पत्नीचा गर्भपात करण्यासाठी त्यांना गर्भपाताच्या गोळ्यांचा जास्तीच्या मात्रा दिल्या. ही गरजेपक्षा जास्त मात्रा झाल्याने रक्तस्त्राव होऊन वैशाली क्षीरसागर यांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Aurangabad Crime)

 

दरम्यान, याप्रकरणी पती बाळासाहेब क्षीरसागर यांच्याविरोधात फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

 

 

Web Title :- Aurangabad Crime | woman dies due to overdose of abortion pills in aurangabad

 

हे देखील वाचा :

Jaykumar Gore Accident | जयकुमार गोरे यांचा अपघात की घातपात; वडील भगवान गोरे यांच्या विधानाने खळबळ

Phone Pay | फोन पे वापरकर्त्यांसाठी कंपनीचा मोठा निर्णय

PSI Death Due To Heart Attack | दुर्देवी ! पोलिस उपनिरीक्षकाचे ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

 

Related Posts