IMPIMP

Jaykumar Gore Accident | जयकुमार गोरे यांचा अपघात की घातपात; वडील भगवान गोरे यांच्या विधानाने खळबळ

by nagesh
Jaykumar Gore Accident | bjp mla jaykumar gore car accident father bhagwan gore comment

सातारा : सरकारसत्ता ऑनलाईन – शुक्रवारी रात्री तीनच्या सुमारास भाजप आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore Accident) यांचा फलटणमधील बानगंगा नदीच्या पुलावर अपघात झाला. त्यांची गाडी आणि गोरेंसह अन्य तीन लोक गाडीसकट 50 फूट खोल दरीत कोसळले. यावेळी सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. गोरे आणि अन्य तिघांवर पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण जयकुमार गोरे यांच्या अपघाताविषयी त्यांचे वडील भगवान गोरे (Jaykumar Gore Accident) यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी या अपघातामागे काहीतरी घातपात असल्याची शक्यता वर्तवली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भगवान गोरे म्हणाले, मी आमदारांशी बोललो आहे. त्यांची प्रकृती आता ठीक आहे. त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नाही. मात्र, एक शंका मनात उत्पन्न होत आहे. रस्त्यावर कुठलीच वाहतूक नसताना गाडीला अपघात कसा घडतो? आमच्या गावात म्हणजे फलटणमध्येच हा अपघात घडला आहे. यामुळे जास्तच शंका येत आहे. त्यांच्या या विधानामुळे सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 

 

आमदार गोरे मुंबईहून आपल्या घरी साताऱ्याला निघाले होते. त्यावेळी फलटणजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला.
त्यांच्यासमवेत गाडीत असलेले इतर तिघेही गंभीर जखमी झाले आहेत.
सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. या अपघाताची माहिती मिळताच तात्काळ बचाव कार्य सुरू झाले.
त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आमदारांसह इतर तिघांवरही पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार,
जयकुमार गोरे आणि इतर तिघांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, त्यांना गंभीर दुखापती झाल्या आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Jaykumar Gore Accident | bjp mla jaykumar gore car accident father bhagwan gore comment

 

हे देखील वाचा :

Phone Pay | फोन पे वापरकर्त्यांसाठी कंपनीचा मोठा निर्णय

PSI Death Due To Heart Attack | दुर्देवी ! पोलिस उपनिरीक्षकाचे ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

Deepak Kesarkar | संजय राऊत यांच्या चौकशीच्या मागणीला दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर

Honey Singh | आता गायक हनी सिंगने पठाण चित्रपटातील गाण्याबद्दल केले ‘हे’ मोठे वक्तव्य

 

Related Posts