IMPIMP

Knee Pain | तुमचे गुडघे आणि सांध्यांमध्ये वेदना होतात का? शास्त्रज्ञांनी शोधली नैसर्गिक पद्धत; जाणून घ्या

by nagesh
Knee Pain | knee pain natural treatment painkiller olive leaf extract can reduce knee pain how can i get rid of knee pain

सरकारसत्ताऑनलाइन – Knee Pain | वाढत्या वयानुसार शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. ज्यामध्ये मधुमेह, थकवा, अशक्तपणा (Diabetes, Fatigue, Weakness) इ.चा समावेश आहे. याशिवाय गुडघेदुखी (Knee Pain) ही देखील एक अशी समस्या आहे, जी वाढत्या वयाबरोबर वाढते. चुकीची बसण्याची मुद्रा (Wrong Sitting Posture), सांधेदुखी (Arthritis), बर्सायटिस (Bursitis), लठ्ठपणा (Obesity), फ्रॅक्चर (Fractures) आदींमुळे गुडघेदुखीची समस्या (Knee Pain Problem) तरुणांमध्ये सुद्धा दिसून येत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

गुडघेदुखी कमी करण्यासाठी लोक विविध उपाय करतात. पण अनेक बाबतीत ती कमी होत नाही. नुकतेच एक संशोधन समोर आले आहे, ज्यानुसार झाडाच्या पानांचा अर्क गुडघेदुखीमध्ये (Knee Pain) खूप आराम देतो.

 

काय सांगते संशोधन (What Research Says)
हे संशोधन स्विस शास्त्रज्ञांनी केले आहे. संशोधनात असे आढळून आले की ऑलिव्ह (Olive) झाडाच्या पानांचा अर्क वेदनाशामक म्हणून काम करू शकतो. ऑलिव्हच्या झाडाच्या पातळ आणि सरळ पानांमध्ये खूप चांगली संयुगे आढळतात, ज्याला पॉलिफेनॉल (Polyphenol) म्हणतात.

 

यामध्ये अँटी-इंफ्लॅमेटरी (Anti-inflammatory) प्रभाव असतो आणि जुनाट सांधेदुखी असलेल्या रुग्णांमध्ये सूज कमी होण्यास मदत होते.
संशोधन सांगते की, ऑलिव्ह ऑइल (Olive Oil) कोरोनरी धमन्यांमध्ये चरबीचा संचय कमी करून हृदयाचे रक्षण करते. या व्यतिरिक्त, हे स्तनाचा कर्करोग (Breast Cancer), अल्सरेटिव्ह कोलायटिस (Ulcerative Colitis) आणि अगदी नैराश्याचा धोका (Risk Of Depression) कमी करण्यास देखील मदत करू शकते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

124 लोकांवर केले संशोधन (Research Done On 124 People)
मस्कुलोस्केलेटल डिसीज जर्नल थेरप्युटिक अ‍ॅडव्हान्सेसमध्ये (Therapeutic Advances in Musculoskeletal Disease (Journal)) प्रकाशित झालेल्या या संशोधनात 55 आणि त्याहून अधिक वयाच्या 124 लोकांचा समावेश केला होता.
या संशोधनाचे नेतृत्व स्विसचे हाडांचे शास्त्रज्ञ मेरी-नोले होरकाजादा (Marie-Noelle Horcajada) यांनी केले.

 

124 लोकांपैकी, पुरुष आणि स्त्रिया दोघेही समान संख्येत होते आणि त्यापैकी अर्ध्याहून अधिक लोकांचे वजन जास्त होते.
त्यापैकी 62 जणांना 125 मिग्रॅ ऑलिव्ह पानांचा अर्क गोळ्यांच्या स्वरूपात दिवसातून दोनदा देण्यात आला आणि अर्ध्यांना प्लेसबो देण्यात आले.

 

6 महिन्यांनंतर, त्यांच्या वेदनेचे परिक्षण गुडघ्याची दुखापत आणि ऑस्टियोआर्थराइटिस आउटकम स्कोर (KOOS) च्या आधारावर करण्यात आले.
KOOS स्कोअर जितका जास्त असेल तितका त्रास कमी होईल.
निष्कर्षांमध्ये असे आढळून आले की ज्यांनी ऑलिव्हच्या पानांचा अर्क घेतला त्यांचा KOOS स्कोअर सुमारे 65 होता,
तर ज्यांनी प्लेसबो घेतले त्यांचा स्कोअर सुमारे 60 होता.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

संशोधकांच्या मते, आहारातील पूरक आहार गुडघेदुखी कमी करू शकतो.
प्राचीन ग्रीसपासून ऑलिव्हची पाने नैसर्गिक उपचारांमध्ये वापरली जात आहेत.
इम्युनिटी वाढवण्यासाठी ऑलिव्हच्या पानांचा (Olive Leaves) वापर करत असत.
पण त्याचा अर्क घेणे तुमच्यासाठी योग्य आहे की नाही, यासाठी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्या.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Knee Pain | knee pain natural treatment painkiller olive leaf extract can reduce knee pain how can i get rid of knee pain

 

हे देखील वाचा :

Edible Oil in India | खाद्यतेलाच्या किंमती आणखी भडकण्याची शक्यता; एका अहवालातून माहिती समोर

Diabetes Causing Foods | केवळ साखर नव्हे, ‘या’ 5 हेल्दी गोष्टी सुद्धा आहेत डायबिटीजचे कारण, वेगाने वाढू शकते Blood Sugar

Sadabhau Khot | सदाभाऊ खोत यांचा घणाघात; म्हणाले – ‘शरद पवारांचं आडनाव बदलून ‘आगलावे’ करा’

 

Related Posts