IMPIMP

Maharashtra Police News | पोलीस प्रोत्साहन भत्त्याच्या रक्कमेत वाढ करण्याची मागणी

by sachinsitapure
Incentive Allowance

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Police News | पोलिसांच्या वाढत्या शारीरिक तक्रारी कमी व्हाव्यात आणि त्यांना ‘फिट’ राहण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी तंदुरुस्त पोलिसांना दरमहा 250 रुपये प्रोत्साहन भत्ता (Police Incentive Allowance) देण्यास मंजूरी देण्यात आली आहे. सरकारने सन 2006 मध्ये ही योजना जाहीर केली होती. पोलिसांना (Maharashtra Police News) मिळणाऱ्या प्रोत्साहन भत्त्याची रक्कम 1000 रुपये करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला असल्याची माहिती पोलीस महासंचालक (DGP) यांचे उपसहायक (लेखा) कल्पना लोखंडे (Kalpana Lokhande) यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

पोलीस शिपाई (Police Constable) ते पोलीस निरीक्षक (Police Inspector) या संवर्गातील शारीरिक क्षमता धारक पोलीस अधिकारी व अंमलदार यांना शासनाच्या गृह विभागाकडून (Home Department) प्रोत्साहन भत्ता देण्याची योजना सुरु करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय 6 नोव्हेंबर 2006 रोजी काढण्यात आला आहे. त्यानंतर अटी व शर्ती पूर्ण केल्यानंतर प्रतिमाह 250 रुपयांप्रमाणे प्रोत्साहन भत्त्याचे वेतन देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये वाढ करुन 1000 रुपये करण्याची मगणी शासनाकडे करण्यात आली आहे.

तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील (Maharashtra Police News) सर्व पोलीस घटक प्रमुखांनी त्यांच्या आस्थापनेवरील पोलीस अधिकारी व अंमलदार घेत असलेल्या प्रोत्साहन भत्त्याची माहिती तीन दिवसांत पाठवावी असे सांगण्यात आले आहे. ही माहिती शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Related Posts