IMPIMP

Maharashtra Politics | महाविकास आघाडीत बिघाडी ? विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस उत्सुक

by nagesh
Maharashtra Politics mahavikas aghadi nana patole want mlc opposition leader congress

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Maharashtra Politics | विधान परिषदेतील (Legislative Council) विरोधी पक्षनेते (Opposition Leader) पदासाठी शिवसेना (Shivsena) उत्सुक असताना आता काँग्रेसनेही (Congress) विरोधी पक्षनेते पदासाठी उत्सुकता दाखवली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद (Maharashtra Politics) काँग्रेसला मिळावे असे आम्हाला वाटत असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत (NCP) चर्चा सुरु असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी दिली. त्यामुळे आता विरोधी पक्षनेते पदावरुन महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) आता बिघाडी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे विधानपरिषदेच्या विरोधीपक्षनेत्याबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्याशी संपर्क केला जात असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. देशात सदृढ लोकशाही पाहिजे असेल तर सत्तापक्षांनी विरोधकांनी शत्रू समजलं नाही पाहिजे, असं मत पटोले यांनी व्यक्त केले.

 

विधान परिषदेत शिवसेनेचे 13 आमदार असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 10 आमदार आहेत.
शिवसेनेने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद मिळावे यासाठी विधान परिषद उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी पत्र दिले होते.
त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भूमिकेवर सगळ्यांच्या (Maharashtra Politics) नजरा होत्या.
काँग्रेसच्या मागणीला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला तर आघाडीत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होऊ शकतो.
या मुद्यावरुन महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडू शकते.

 

शिंदे भाजप सरकार (Shinde BJP Government) राज्यात स्थापन झाल्यावर राष्ट्रवादीचे अजित पवार (Ajit Pawar) यांची विरोधीपक्षनेते म्हणून निवड करण्यात आली होती.
त्यानंतर विधानपरिषदेत आमचा विरोधीपक्षनेता असावा अशी मागणी आम्ही राष्ट्रवादीकडे करणार असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं.

 

Web Title :-  Maharashtra Politics | mahavikas aghadi nana patole want mlc opposition leader congress

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

 

 

Related Posts