IMPIMP

Maharashtra Politics | शिवसेनेचे टीकास्त्र, ‘राज्यात लोकांच्या घराघरांवर मिंधे-फडणवीस सरकारमुळेच सोन्याची…’

by nagesh
Maharashtra Politics | shivsena saamana editorial targets cm eknath shinde devendra fadnavis government farmer on diwali festival

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – Maharashtra Politics | द्वारका जशी श्रीकृष्णामुळे एका क्षणात सोन्याची झाली, तशी महाराष्ट्रातही लोकांच्या घराघरांवर मिंधे-फडणवीस सरकारमुळे सोन्याची कौले चढली. लक्ष्मीपूजनही थाटामाटात झाले. मिंधे गटाने जो सामना तीन महिन्यांपूर्वी जिंकला त्या गटातील खेळाडू अचानक कुबेर बनले. त्या कुबेरांचे लक्ष्मीपूजन काही ठिकाणी झाले. या चाळीस जणांमुळे सामना जिंकल्याचा आनंद असा की, एका दिवसात 1900 किलो सोन्याची खरेदी झाली, अशी खोचक टीका सामनाच्या अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) करण्यात आली आहे. (Maharashtra Politics)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सामनाच्या अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील (Rain in Maharashtra) लाखो शेतकर्‍यांच्या घरचे दिवे अजूनही विझलेलेच का आहेत, याचे उत्तर कृषीमंत्र्यांच्या या प्रश्नात दडलेले आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषेतील हा ‘सकारात्मक’ बदल राज्यात घडत आहे तो मिंध्यांनी तीन महिन्यांपूर्वी सामना जिंकल्यामुळेच!

 

सध्या राज्यात जे बरे घडते आहे ते फक्त तीन महिन्यांपूर्वी जो सामना मिंधे गटाने जिंकला त्यामुळेच. मुख्यमंत्री एकीकडे 30 लाख शेतकर्‍यांना चार हजार कोटींची मदत दिली असे ‘बुडबुडे’ सोडत आहेत तर तिकडे उद्ध्वस्त शेतकरी (Farmer) ‘मदत देता का, मदत?’ असा टाहो सरकारकडे फोडीत आहे आणि राज्याचे कृषीमंत्री जिल्हाधिकार्‍यांना ‘तुम्ही दारू घेता का, दारू? असा प्रश्न करीत आहेत.

 

धनतेरस, लक्ष्मीपूजन, पाडवा वगैरे प्रत्येक दिवस मस्त झगमगाटात साजरा झाला. व्यापारी वर्गाचे चोपडी पूजन झाले. नरक चतुर्दशीस अनेक नरकासुर पायाखाली कचाकच चिरडून मारले गेले. भाऊबीजेचा थाटही यावेळी वेगळाच होता. गेल्या 75 वर्षांत हा थाटमाट देशाने कधीच पाहिला नव्हता, पण हे सर्व घडू शकले ते दिल्लीत पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) व महाराष्ट्रात मिंधे व फडणवीसांचे सरकार असल्यामुळेच, असे टीकास्त्र सामनातून सोडण्यात आले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मिंधे गटाने तीन महिन्यांपूर्वी सामना जिंकला आहे. त्यामुळे शिधा कशाला घ्यायचा, आपण सराफ बाजार
(Saraf Bazaar) आणि शेअर बाजारात (Stock Market) जाऊ. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेअर बाजार
वधारला. गुंतवणूकदार दोन लाख कोटींनी मालामाल झाले.
मिंधे गटाच्या चाळीस खोकेबाज आमदारांमुळे सोन्याचा बाजार आणि शेअर बाजारही वधारला.
हे सर्व शक्य झाले ते तीन महिन्यांपूर्वी मिंधे गटाने सामना जिंकल्यामुळेच, असे म्हणत शिवसेनेने टीकेचा बाण सोडला आहे.

 

 

Web Title :-  Maharashtra Politics | shivsena saamana editorial targets cm eknath shinde devendra fadnavis government farmer on diwali festival

 

हे देखील वाचा :

Pune Police Inspector Transfer | पुणे शहरातील 3 पोलिस पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

Cyber Intelligence Unit in Maharashtra | ‘महाराष्ट्रात सायबर इंटिलिजन्स युनिट उभारणार’ – देवेंद्र फडणवीस

Maharashtra Politics | ‘मिंधे गटाने जिंकलेल्या सामन्यात खेळाडू अचानक कुबेर बनले…’; शिवसेनेचे शिंदे-फडणवीस सरकारवर पुन्हा जोरदार टीकास्त्र

Pune Crime | राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हाजी गफूर पठाण यांच्यावर गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

 

Related Posts