IMPIMP

Maharashtra Politics | भास्कर जाधवांना शह देण्यासाठी शिंदे गटाचे ‘भैय्या’ मैदानात, ‘या’ मंत्र्याच्या मोठ्या भावाची राजकारणात एन्ट्री

by nagesh
Maharashtra Politics | uday samant brother kiran bhaiya samant political launch to join eknath shinde camp maharashtra political news

रत्नागिरी : सरकारसत्ता ऑनलाइन   Maharashtra Politics | जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे ज्येष्ठ बंधू किरण (भैय्या) सामंत (Kiran Samant) यांनी राजकारणात प्रवेश (Maharashtra Politics) केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गुहागर येथून किरण सामंत यांना विधानसभेचे तिकीट मिळू शकते, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

गुहागर मतदार संघ हा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांचा आहे. आणि मागील काही दिवस भास्कर जाधव शिंदे आणि भाजपच्या (BJP) निशाण्यावर आहेत. त्यांच्या चिपळूण येथील घरावर हल्ला देखील झाला होता. त्यामुळे आगामी विधानसभेत (Maharashtra Politics) त्यांच्या विरोधात त्यांना शह देण्यासाठी किरण सामंत (Kiran Samant) यांना उभे केले जाऊ शकते. त्यामुळे किरण सामंत यांची गुहागरमध्ये उमेदवारी नक्की करण्याची मागणी काही युवा संघटनांनी केली आहे. तसेच शिंदे गटाकडून (Shinde Group) देखील त्यांना पाठबळ दिले जात आहे.

 

कोकणाच्या विकासासाठी आणण्यात आलेल्या रत्नसिंधू समृद्धी योजनेच्या प्रकल्पाच्या (Ratna Sindhu Samriddhi Yojana) सदस्यपदी किरण सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा राजकारणात देखील प्रवेश झाला आहे. रत्नागिरीला लागून असलेल्या गुहागर भागात देखील त्यांचे समर्थक आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी भास्कर जाधव यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेऊन शिंदे यांच्या गटात प्रवेश केला होता. किरण सामंत यांचा गुहागर तालुक्यातील संपर्क लक्षात घेऊन त्यांना भास्कर जाधवांच्या विरोधात उभे केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

गुहागर विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा होता. 2009 साली शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपात बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी रामदास कदमांसाठी (Ramdas Kadam) हा मतदारसंघ शिवसेनेकडे घेतला.
पण भाजपचे विनय नातू (Vinay Natu) यांनी तेव्हा बंडखोरी केली.
त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीत (NCP) असलेल्या भास्कर जाधव यांच्या ताब्यात गेला.
राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेल्यावरही भास्कर जाधव यांनी या मतदार संघात आपले वर्चस्व कायम राखले आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे शिवसेना नेते भास्कर जाधव यांना आता शह देण्यासाठी
मंत्री उदय सामंत यांनी या मतदारसंघात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Politics | uday samant brother kiran bhaiya samant political launch to join eknath shinde camp maharashtra political news

 

हे देखील वाचा :

Kishori Pednekar | तुम्ही फोडलेल्या फटाक्यांचे ‘पॅकेज’ वेगळे आहे, एकनाथ शिंदेंच्या टीकेला किशोरी पेडणेकरांचे प्रत्युत्तर

Pune Crime | दुचाकी लावण्याच्या वादातून दुकानदाराला बेदम मारहाण, कुमठेकर रस्त्यावरील घटना

Pune Crime | पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून वारजे माळवाडी परिसरात संघटित गुन्हेगारी करणार्‍या टोळीवर मोक्का

 

Related Posts