IMPIMP

Kishori Pednekar | तुम्ही फोडलेल्या फटाक्यांचे ‘पॅकेज’ वेगळे आहे, एकनाथ शिंदेंच्या टीकेला किशोरी पेडणेकरांचे प्रत्युत्तर

by nagesh
Kishori Pednekar | kishori pednekar criticizes eknath shidne on commenting on shivsena party revolt

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन ठाण्यात आयोजित दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आम्ही देखील तीन महिन्यांपूर्वी फटाके फोडले, असे म्हंटले होते. त्याचा समाचार मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी घेतला आहे. यावेळी किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी पॅकेजचा उल्लेख करत शिंदे यांना टोला लावला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मे महिन्यात तुम्ही जे फटाके आणि लवंगी बार फोडले, त्यांचे पॅकेट म्हणजे पॅकेज वेगळे आहे, असे किशोरी पेडणेकर खोचकपणे म्हणाल्या आहेत. पैसे देऊन शिवसेनेतील आमदार फोडण्यात आले, असे त्यांना म्हणायचे होते, असे पेडणेकर (Kishori Pednekar) म्हणाल्या.

 

शिवसेनेत बंड झाल्यापासून शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदार आणि खासदारांवर शिवसेनेचा ठाकरे गट सतत टीका करत आला आहे. तसेच शिंदे यांच्या गटाकडून सतत त्यांनी शिवसेना का सोडली, यावर स्पष्टीकरण दिले जात आहे. हिंदुत्व आणि काँग्रेस (Congress) राष्ट्रवादीसोबत (NCP) युती ही त्यातील प्रमुख दोन कारणे. पण शिवसेनेचा ठाकरे गट त्यांच्यावर प्रत्येकी 50 कोटी घेतल्याचा आरोप करीत आहे.

 

मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाण्याच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या भाषणात म्हणाले,
कालपासून दिवाळीचे फटाके फुटत आहेत. पण आम्ही तीन महिन्यांपूर्वी फटाके फोडले होते.
त्याचा आवाज आज देखील घुमतो आहे.
आमचे हितचिंतक आजही त्या फटाक्यांच्या आवाजाचे डेसिबल मोजत आहेत. त्यांना ते मोजू दे, आम्हाला काही समस्या नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Kishori Pednekar | kishori pednekar criticizes eknath shidne on commenting on shivsena party revolt

 

हे देखील वाचा :

Pune Crime | दुचाकी लावण्याच्या वादातून दुकानदाराला बेदम मारहाण, कुमठेकर रस्त्यावरील घटना

Pune Crime | पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून वारजे माळवाडी परिसरात संघटित गुन्हेगारी करणार्‍या टोळीवर मोक्का

CM Eknath Shinde | ‘आम्ही देखील तीन महिन्यांपूर्वी फटाके फोडले, आमचे हितचिंतक आजही…’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

Pune District Court | ‘महिला वकिलांनी कोर्टात केस नीट करू नयेत, लक्ष विचलित होते’ म्हणत पुणे जिल्हा कोर्टाने काढली नोटीस

 

Related Posts