IMPIMP

Mahesh Manjrekar | महेश मांजरेकरांनी केली बिग बजेट सिनेमाची घोषणा ; ‘हा’ अभिनेता साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका

by nagesh
Mahesh Manjrekar | akshay kumar play chhatrapati shivaji maharaj in mahesh manjrekar vedat marathe veer daudale saat film

सरकारसत्ता ऑनलाईन  – नुकताच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev Movie) हा
मराठीतील पहिला असा बहुभाषिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता त्यानंतर अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar)
यांनी बिग बजेट नवा सिनेमा घोषित केला. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ (Me Shivajiraje Bhosale Boltoy) या चित्रपटानंतर जवळपास सात
वर्षांनी महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) पुन्हा एकदा शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपट घेऊन येत आहेत. ‘वेडात मराठी वीर दौडले सात’ (Vedat Marathe Veer Daudale Saat) असे नव्या चित्रपटाचे नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत घोषणा करण्यात आली. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हा चित्रपट केवळ मराठीतच नाही तर हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत देखील प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) प्रमुख भूमिका बॉलीवूडचा (Bollywood) प्रसिद्ध अभिनेता खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) साकारणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी सिनेमाची पहिली झलक पाहताच हा सिनेमा सुपरहिट होईल असे म्हणत सर्वांनाच शुभेच्छा दिल्या. ‘वेडात मराठी वीर दौडले सात’ या सिनेमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या 7 बलाढय मावळ्यांची यशोगाथा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सात तगडे कलाकार देखील या सिनेमात दिसणार आहेत. अक्षय कुमार हा पहिल्यांदाच मराठी सिनेमात काम करत असल्यामुळे तो खूपच उत्सुक दिसत आहे. याबाबत तो म्हणाला, “महाराजांची भूमिका साकारायला मिळणं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तेवढेच नाही तर माझे स्वप्न देखील पूर्ण झाले. त्याचबरोबर ही जबाबदारी ची गोष्ट देखील आहे. या जबाबदारीवर खरे उतरण्याचे मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे”. अक्षय कुमारने याआधी मराठी सिनेमांची निर्मिती केली होती मात्र पहिल्यांदाच तो
मराठी सिनेमात काम करणार आहे.

या चित्रपटात बिग बॉस मराठी तिसऱ्या सिझन मधील तीन स्पर्धक अभिनेता विशाल निकम (Vishal Nikam),
उत्कर्ष शिंदे (Utkarsh Shinde) आणि जय दुधाने (Jay Dudhane) पहिल्यांदाच सिनेमासृष्टीत पदार्पण
करताना दिसणार आहेत. तर अभिनेता प्रवीण तरडेचा (Pravin Tarde) देखील भरधास्त अभिनय या चित्रपटात
पाहायला मिळणार आहे. एकंदरीत प्रेक्षक या चित्रपटाकडे डोळे लावून बसले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Mahesh Manjrekar | akshay kumar play chhatrapati shivaji maharaj in mahesh manjrekar vedat marathe veer daudale saat film

 

हे देखील वाचा :

Pune Crime | मारहाण प्रकरणात न्यायालयाचे महिला सरपंचाविरुद्ध खटला चालवण्याचे आदेश

Maharashtra IAS Officer Transfer | सनदी अधिकारी अशिष कुमार सिंह, पराग जैन नैनुतिया, डी. टी. वाघमारे आणि आभा शुक्ला यांच्या बदल्या

Jayant Patil On Sambhaji Bhide | संभाजी भिडेंच्या जवळिकीच्या चर्चेचा जयंत पाटलांनीच लावला निकाल; म्हणाले – ‘सत्तारूढ पक्ष अशाप्रकारची…’

 

Related Posts