IMPIMP

Male Fertility | इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसचा गरजेपेक्षा जास्त वापर पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर करू शकतो परिणाम, जाणून घ्या कसा

by nagesh
 Male Fertility | know the male infertility causes and its diagnosis

सरकारसत्ता ऑनलाइन – Male Fertility | पुरुषांमध्ये वंध्यत्वाची अनेक कारणे असू शकतात. उदाहरणार्थ- अनियंत्रित जीवनशैली, आहार आणि अनुवांशिकता (Uncontrolled Lifestyle, Diet And Heredity). पण तुम्हाला माहिती आहे का की इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या अतिवापरामुळे सुद्धा तुमच्या प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो. पुरुषांची प्रजनन क्षमता (Male Fertility) आणि सर्व संशोधन अहवाल पाहता आता अनेक डॉक्टरही यावर विश्वास ठेवू लागले आहेत.

 

पुरुषांच्या वंध्यत्वावर संशोधन करणार्‍या सर्व अहवालांनुसार, मोबाईल फोन, लॅपटॉप, अगदी मायक्रोवेव्हच्या वापरामुळे पुरुषांमध्ये वंध्यत्व येत आहे. पुरुषांच्या प्रजननक्षमतेत होणारी घट संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनली आहे. संशोधनानुसार, हायटेक जीवनशैलीमुळे जीवन सोपे होत आहे, परंतु त्याचे धोकेही आहेत. मोबाईल, लॅपटॉप, आयपॉड, वाय-फाय, ब्लूटूथ, इअरफोन आदींचा प्रजनन क्षमतेवर परिणाम होत आहे (Male Fertility).

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

काय म्हणते संशोधन (What Research Says) :
मोबाइल फोनमधून बाहेर पडणार्‍या रेडिएशनचा पुरुषांच्या स्पर्म काऊंट आणि गतिशीलतेवर नकारात्मक परिणाम होत असल्याचे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. शुक्राणूंची गतिशीलता किंवा Mortality स्पर्मचा जोश सूचित करते. जर शुक्राणूमध्ये गतिशीलता नसेल, तर ते अंड्यावर तयार झालेला थर तोडू शकणार नाहीत. परिणामी, शुक्राणू तरंगत अंड्यामध्ये प्रवेश करू शकणार नाहीत, यामुळे वंध्यत्वाचा धोका निर्माण होईल.

 

एशियन जर्नल ऑफ फार्मास्युटिकल अँड क्लिनिकल रिसर्च (Asian Journal Of Pharmaceutical And Clinical Research) ने केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की सामान्य लोकसंख्येतील 15 ते 20 टक्के लोकांमध्ये वंध्यत्वाची समस्या आहे. या दरामध्ये 20 ते 40 टक्के वंध्यत्व पुरुषांमध्ये आहे, म्हणजेच 100 लोकांपैकी 20 जणांना वंध्यत्वाची समस्या असेल तर या 20 लोकांपैकी 4 ते 8 पुरुष आहेत. आकडेवारीनुसार, भारतातील 23 टक्के पुरुष वंध्यत्वाच्या समस्येने त्रस्त आहेत.

 

पुरुषांमध्ये वंध्यत्वाची कारणे कोणती (What Are The Causes Of Infertility In Men) ?
पुरुषांमधील शुक्राणूंवर कोणत्या गोष्टींचा नकारात्मक परिणाम होतो हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. संशोधनानुसार मोबाईल फोन, लॅपटॉप, कॉम्प्युटर, मायक्रोवेव्ह ओव्हन, टीव्ही, वायफाय, फोन टॉवर इत्यादींमधून बाहेर पडणार्‍या रेडिएशनचा शुक्राणूंची संख्या, त्याची गतिशीलता, त्याची रचना यावर परिणाम होतो. इतकेच नाही तर हे सर्व शुक्राणूंच्या डीएनए, हार्मोन्स आणि अँटिऑक्सिडंट एन्झाइम्सचेही नुकसान करतात.

 

यावर उपाय काय आहे (What Is The Solution) ?
ही इलेक्ट्रॉनिक उपकरणे जपून वापरा. शुक्राणूंच्या आरोग्यासाठी विश्रांती आवश्यक आहे.
किमान 7 ते 8 तास झोप घ्या. यामुळे शुक्राणूंची गुणवत्ता सुधारते. दररोज एकाच वेळी झोपणे चांगले मानले जाते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आजच्या काळात फोनचा वापर पूर्णपणे बंद करणे शक्य नसले तरी शक्य तितका कमी वापरा.
लहान बदल करा, जसे की सेलफोन कुठे ठेवायचा याकडे लक्ष देणे. आपल्यापैकी बरेच जण फोन खिशात ठेवतात,
त्याऐवजी फोन बॅगेत ठेवण्याची सवय लावून घ्या. हा छोटासा बदल मोबाईल फोनचे रेडिएशन एक्सपोजर कमी करण्यास मदत करू शकतो.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Male Fertility | know the male infertility causes and its diagnosis

 

हे देखील वाचा :

Shivsena Leader Abdul Sattar | शिवसेना नेत्याचं मोठं विधान; म्हणाले – ‘उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला तर अमरावतीत जाऊन…’

Pune Mandai Traffic Jam | मेट्रोच्या कामामुळे मंडईतील वाहतूक कोंडी श्वास कोंडणारी ! वाहतूक पोलीस, मेट्रो आणि अतिक्रमण विभागाने सोडले पुणेकरांना वाऱ्यावर

Weight Loss Tips | पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपयोगी पडतील ‘हे’ 7 आयुर्वेदिक उपाय; जाणून घ्या

 

Related Posts