IMPIMP

Manisha Kayande on Raj Thackeray | ‘अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या राज ठाकरेंनी…’; मनीषा कायंदेंची राज ठाकरेंवर टीका!

by nagesh
Shivsena | before teaching others look at yourself first shivsena Spokesperson Manisha Kayande criticizes mns chief raj thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Manisha Kayande on Raj Thackeray | राज्यात भोंग्यांवरून राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh CM Yogi Adityanath) यांनी भोंग्यांबाबत (Loudspeakers) घेतलेल्या निर्णयाचं कौतुक होताना दिसत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनीही योगी आदित्यनाथ यांचं कौतुक करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी राज ठाकरे (Manisha Kayande on Raj Thackeray) यांच्यावर टीका केली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार, असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. त्यासोबतच ठाकरे सरकारवर निशाणा साधताना, आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. यालाच मनीषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

 

अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या राज ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन करण्याआधी माहिती घ्यायला हवी होती. मस्जिदच नव्हे तर मंदिरावरीलही अनधिकृत भोंगे योगी यांनी उतरवले आहेत, असं मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं असून एक व्हिडीओही ट्विट केला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन करण्यासाठी उत्तर प्रदेशमधील भोंगे उतरवण्यात आले आहेत. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत उत्तर प्रदेशमधील जवळपास 10,923 स्पीकर्स हे काढून घेतले असल्याची माहिती आहे.

 

Web Title :- Manisha Kayande on Raj Thackeray | shivsena leader manisha kayande has criticized mns chief raj thackeray

 

हे देखील वाचा :

Maharashtra Cabinet Decisions | पुण्यातील येरवडा येथे नवीन ITI सुरु करण्यास मंत्रिमंडळाची मंजूरी

INS Vikrant Fund Case | आयएनएस विक्रांत प्रकरणात सोमय्या पिता-पुत्रांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

Maharashtra Cabinet Meeting | महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीतील 9 महत्त्वाचे निर्णय; जाणून घ्या

 

 

Related Posts