IMPIMP

Miraj Crime | मिरजमध्ये तरुणाचा धारदार हत्याने वार करून निर्घृण खून; परिसरात खळबळ

by nagesh
Miraj Crime | murder of a young man in miraj in sangli with a sharp weapon

मिरज : सरकारसत्ता ऑनलाईन   Miraj Crime | सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये एका तरुणाचा धारदार हत्याराने सपासप वार करून खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मिरजमधील (Miraj Crime) सांगलीकर मळा येथे घडली असून, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच मिरज पोलिसांनी (Miraj Police) घटनास्थळी धाव घेतली.

 

ऋषिकेश बाळासाहेब जाधव Rishikesh Balasaheb Jadhav (वय 25, रा. घोरपडे वाडा, मिरज) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ऋषिकेश याचा मृतदेह सांगलीकर मळा (Sanglikar Mala) येथील रिकाम्या जागेत आढळून आला. हल्लेखोरांनी ऋषिकेशचा धारदार हत्याराने निर्घृण खून करून चेहरा चेंदामेंदा केला आहे. ऋषिकेश याचा रात्रीच्या सुमारास खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे, परंतु हा खून नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (Miraj Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक बसवराज तेली (SP Basavaraj Teli),
पोलीस उपअधीक्षक अजित टिके (DySP Ajit Tike), पोलीस निरीक्षक संजीव झाडे (Police Inspector Sanjeev Zade)
यांच्यासह श्वानपथक व पोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. मृत तरुणाच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा करण्यात
आल्याने पोलिसांनी कपड्यावरून नातेवाइकांचा शोध घेऊन मृतदेहाची ओळख पटवली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

 

Web Title :- Miraj Crime | murder of a young man in miraj in sangli with a sharp weapon

 

हे देखील वाचा :

Supriya Sule | ‘हे अजिबात चालणार नाही’ ! संसदेत सुप्रिया सुळे आक्रमक

Maharashtra Karnataka Border Issue | पुण्यात कर्नाटक सरकारचा निषेध करण्यासाठी अनोखी पद्धत; इडली, सांबार आणि मसाला डोश्यावर…

NCP Chief Sharad Pawar | ‘या भानगडीत न पडता दत्त उपासना करावी’; नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री महाराज यांचा शरद पवारांना टोला

 

Related Posts