IMPIMP

MLA Gulabrao Patil | शिंदे गटातील नाराज 22 आमदार भाजपमध्ये जाणार? गुलाबराव पाटील म्हणाले -‘राहिलेले आमदार…’

by nagesh
Gulabrao Patil | gulabrao patil gets angry and slams opposition in jalgaon

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेनेने (Shivsena) दावा केला होता की, शिंदे गटाचे किमान 22 आमदार (Shinde Group MLA) नाराज आहेत. यातील बहुसंख्य आमदार स्वतःला भाजपात (BJP) विलीन करून घेतील. या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. शिवसेनेने केलेल्या या दाव्यावर शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील (MLA Gulabrao Patil) यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, आपले राहिलेले आमदार सांभाळण्यासाठीच हे वक्तव्य केल जात आहे. तसेच गुलाबराव पाटील (MLA Gulabrao Patil) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP MLA Jayant Patil) यांच्यावर देखील निशाणा साधला.

 

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले होते की, दिवाळीनंतर राजकीय बॉम्ब फुटणार आहेत. यावर प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटील (MLA Gulabrao Patil) म्हणाले, जयंत पाटील यांच्याकडे बॉम्बच काय तर लवंगी फटाकाही नसेल. दरम्यान, शिंदे गटाचे 22 आमदार नाराज असून ते भाजपात विलिन होतील, अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या रोखठोक सदरातून करण्यात आली होती. यात म्हटले होते की, भारतीय जनता पक्षाने शिंदे व त्यांच्या काही लोकांना ‘ईडी’ (ED) वगैरेच्या फासातून तूर्त वाचवले, पण या सगळ्यांना कायमचे गुलाम करून ठेवले. सरकारचे सर्व निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) घेतात व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) ते निर्णय जाहीर करतात. आता दिल्लीसही फडणवीस एकनाथ शिंदेंशिवाय जातात.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या लेखात पुढे म्हटले होते की, मुख्यमंत्रिपदी शिंदे ही भाजपने केलेली तात्पुरती व्यवस्था आहे.
त्यांची मुख्यमंत्रिपदाची वर्दी कधीही उतरवली जाईल, हे आता सगळ्यांना समजून चुकले आहे.
शिंदे यांच्या ‘तोतया’ गटास अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत उतरवायला हवे होते.
शिंदे गटाचे किमान 22 आमदार नाराज आहेत. यातील बहुसंख्य आमदार स्वतःला भाजपात विलीन करून घेतील.
त्यानंतर शिंदे यांचे काय होणार, असे मी त्यांच्याच एका नेत्यास विचारले तेव्हा तो म्हणाला, शिंदे यांचा रामदास आठवले (Ramdas Athawale) होईल.

 

Web Title :- MLA Gulabrao Patil | gulabrao patil reaction on shivsena statement about unhappy mla of shinde

 

हे देखील वाचा :

BJP MLA Atul Bhatkhalkar | मविआच्या काळात न फुटलेले घरकोंबडा ब्रँडचे फटाके…, अतुल भातखळकरांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

MLA Sanjay Shirsat | ‘उद्धव ठाकरेंनी आम्हाला दिलासा दिला नाही, त्यामुळे हे रामायण घडले’- आमदार संजय शिरसाट

Kishori Pednekar | आमची दिवाळी पहाट दरवर्षी होते, यांची पहिल्यांदा होत आहे, किशोरी पेडणेकरांचा भाजपला टोला

NCP Chief Sharad Pawar | शिंदे-फडणवीस सरकारची कर्जमाफी फसवी, शरद पवारांनी सांगितला भू विकास बँकेचा इतिहास

 

Related Posts